आंतरराष्ट्रीय महिला दिन : यशाचे शिखर गाठणाऱ्या ‘या’ महिला तुम्हालाही देतील प्रेरणा
महिला विशेष

आंतरराष्ट्रीय महिला दिन : यशाचे शिखर गाठणाऱ्या ‘या’ महिला तुम्हालाही देतील प्रेरणा

वर्ष 2020 कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना या महिला तेव्हाही आपापल्या मोहिमेवर होत्या. कोणी घरामध्ये, कोणी कामाच्या ठिकाणी, कोणी परिचारिका म्हणून तर कोणी शास्त्रज्ञ म्हणून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. जगातील प्रत्येक महिला वेगळी आणि अप्रतिम आहे. ती कोणत्या ना कोणत्या रुपात एक उत्तम उदाहरण आहे, अशाच काही महिला त्याच्या कार्याने आपल्याला प्रेरणा देत असतात. जागतिक महिला दिनानिमित्त अशा काही महिलांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. ज्या महामारीच्या काळात जग थांबले असताना त्या आपल्या मोहिमेवर, कार्यात मग्न होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भव्या लाल: अमेरिकन अंतराळ मोहिमेच्या कामाची जबाबदारी
भारतात जन्मलेल्या आणि वाढवलेल्या भव्या लाल या जगातील सर्वात मोठी अवकाश संस्था नासा येथील कार्यवाहक चीफ ऑफ स्टाफ आहेत. त्या नासाच्या कामाची रणनीती ठरवतात. भव्या आजकाल दिवसाचे 10 ते 14 तास काम करत आहे. दररोज फोनवर त्याची दीर्घ बैठका सुरु आहेत.

भव्या लाल यांनी आपले शालेय शिक्षण भारतात केले. त्या बारावीनंतर पूर्ण शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अणु अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मग त्यांनी येथूनच तंत्रज्ञान आणि धोरण प्रवाहात डबल मास्टर केले. यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतर्फे पब्लिक पॉलिसी आणि पब्लिक अडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी केली. जगातील अव्वल जर्नल्समध्ये त्यांचे 50 हून अधिक पेपर प्रकाशित झाले आहेत.

किशोरी पेडणेकर 
एप्रिल २०२० मध्ये, मुंबईत कोरोना शिगेला असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नायर रुग्णालयात परिचारिकेची जबाबदारी पार पडत होत्या. 57 वर्षीय किशोरी पेडणेकरांची हीच सेवा प्रेरणा बनली. 1992 मध्ये शिवसेनेच्या सदसया होण्यापूर्वी किशोरी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये एका दशकापेक्षा जास्त काळ परिचारिका होत्या. मुंबईच्या 77 व्या महापौर असलेल्या किशोरी सकाळी 8 ते मध्यरात्री 2 या वेळेत काम करतात. आपले शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे, हि त्यांची प्राथमिकता आहे, असे किशोरी सांगत असतात.

आर्या राजेंद्रन: महिला सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता
आर्या राजेंद्रन डिसेंबर 2020 मध्ये केरळची राजधानी तिरुअनंतपुरमच्या महापौर पदी विराजमान झाल्या. आर्या या देशातील सर्वात तरुण महापौर आहेत. आपले शहर महिलांसाठी सुरक्षित करणे हे, माकपच्या आर्या राजेंद्रन यांचे पहिले प्राधान्य आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. आई एलआयसी एजंट आहे. आर्या केरळ राज्य समितीच्या सदस्य आहेत, जे स्थानिक प्रशासनाला सामुदायिक स्वयंपाकघर, आपत्कालीन औषध, जागरूकता कार्यक्रम चालविण्यास मदत करतात. नागरी निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला ५४९ मतांनी पराभूत केले.

रितु करीधल: देशाच्या रॉकेट वूमन
भारतीय अंतराळ संस्थेत मोहिमेची रचना करण्याचे काम रितू कारीधाल करतात. चंद्रयान -२ ची उद्दीष्टे कशी मिळवायची हे रितू यांनीच ठरवले होते. चंद्रयान -२ च्या मिशन डायरेक्टर म्हणूननही त्यांनी काम पहिले आहे. रितू यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्या इस्रो आणि नासाशी संबंधित बातम्यांची कात्रणे जपून ठेवत असत. त्यांनी भौतिकशास्त्रात बीएससी आणि त्यानंतर लखनौ विद्यापीठातून एमएससी केले. रितू म्हणतात, यश मिळविण्यासाठी टाइम मॅनेजमेंट आवश्यक आहे आणि ही कला फक्त शिस्तीनेच येऊ शकते.

मानसी जोशी: पॅरा बॅडमिंटन चॅम्पियन
मानसी पॅरा बॅडमिंटनची जागतिक विजेती आहे. २०२० मध्ये मानसी जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली. टाईम मासिकाने मानसीला नेक्स्ट जनरेशन लीडरच्या यादीत स्थान दिले आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून मानसीने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. मानसीचे वडील भाभा अणु संशोधन केंद्रात कामाला होते. २०११ मध्ये झालेल्या ट्रक अपघातात आपला जीव वाचविण्यासाठी मानसीला आपला पाय कापावालागला. 50 दिवस रूग्णालयात उपचार घेऊन घरी आली. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर कृत्रिम पाय लावून तिने खेळात वापसी केली. 2014 मध्ये एक व्यावसायिक खेळाडू बनली. तिने पुलेला गोपीचंद अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. बार्बी कंपनीने मानसीला समर्पित ‘बार्बी डॉल’ बाजारात आणला आहे.

अपर्णा कुमारः सात खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली नागरी सेवक
उत्तराखंडच्या चामोलीमध्ये बचावाची जबाबदारी अपर्णा यांच्या खांद्यावर होती. सात खंडातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या अपर्णा कुमार या पहिल्या नागरी सेवक आहे. २०१२ मध्ये ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील पीएसईच्या नवव्या बटालियनमध्ये कमांडंट म्हणून कार्यरत होत्या. पूर्वी हे एक विशेष पोलिस दल असायचे. 1992 पर्यंत आयटीबीपीची 20 हजार फूट उंची असलेल्या बटालियन चौकी या बटालियनजवळ होती. या बटालियनमध्ये पर्वतारोहणात वापरलेली 1965-70 ची उपकरणे पाहून त्याला गिर्यारोहणात रुची निर्माण झाली.

अंशु जामसेनपा: पाच वेळा एव्हरेस्ट सर करणारी महिला
अंशु जामसेनपाने 2011 ते 2017 या काळात पाच वेळा एव्हरेस्ट सर केले. 2017 मध्ये, 5 दिवसांत दोनदा एव्हरेस्टने सर करून जागतिक विक्रम केला. यासाठी अंशुला 2018 मध्ये तेन्झिंग नारगू नॅशनल अ‍ॅडव्हेंचर अवॉर्डही मिळाला आहे. तर यावर्षी अंशुला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अन्शुने 2009 पासून गिर्यारोहणाला सुवात केली होती. तिचे वडील इंडो तिबेट सीमेवर पोलिस अधिकारी आहेत आणि आई नर्स आहे. 41 वर्षीय अंशु दोन मुलांची आई आहे. अंशु ‘स्वच्छ भारत अभियाना’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसुद्धा होती.

आयशा अजीज: सर्वात तरुण पायलट
काश्मीरमधील बारामुला येथील रहिवासु असणारी 25 वर्षीय आयशा ही देशातील सर्वात कमी वयाची व्यावसायिक पायलट आहे. वयाच्या 16 व्या वर्षी आयशाने रशियात जेट मिग -29 विमान उड्डाण करण्याचे प्रशिक्षण घेतले. 2017 मध्ये व्यावसायिक पायलट होण्यासाठी परवाना मिळवला. आता तो जेट मिग -२. विमान उड्डाण करायला तयार आहे.

भावना कांत: पहिली महिला लढाऊ पायलट
फ्लाइट लेफ्टनंट भावना कॉम्बॅट मोहिमेसाठी पात्र ठरणारी पहिली महिला लढाऊ पायलट आहे. बिहारमधील दरभंगाची भावनाने बी.ई. केल्यावर 2016 मध्ये हवाई दलात उड्डाण करणारे हवाई परिवहन अधिकारी पदावर रूजू झाली. मार्च 2020 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिला नारी शक्ती सन्मान देऊन गौरव केला.