भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या ३४ वर्षीय पत्नीवर त्यांच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत. याशिवाय रहमत अली आणि महबूल असे दोन आरोपी आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिला आपल्या घरी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. नुकतंच महिलेला मेंदूघाताचा झटका आला होता. यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या दिवशी कुटुंबाने महिलेला उपचार सुरु असणाऱ्या रुग्णालयात नेलं. दरम्यान या घटनेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. टीएमसी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टीएमसी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे, असा आरोप भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालविया यांनी केला आहे.