राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात
बातमी महाराष्ट्र

राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात

मुंबई : राज्यात एक प्रकारे थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आले आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी जिल्ह्यात 5.6 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 7.4 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागात […]

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…
बातमी महाराष्ट्र

सरकार पडण्याकडे अनेकजण डोळे लावून बसले होते; पण आपल्या आशीर्वादाने सरकारने वर्ष पूर्ण केलं

मुंबई : “आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. तसेच, गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने… […]

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…
बातमी महाराष्ट्र

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…

मुंबई : देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत […]

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधणार; लोकल सेवा सुरु करणार?

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर राज्यसरकारने सर्वात प्रथम मुंबईची लाइफलाईन म्हणजे लोकल बंद केन्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा लोकल सुरु करण्याची मागणी सर्वसामान्य जनता करत आहे. अशातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. दरम्यान, कोरोना कालावधीत मुख्यमंत्री […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन झालं. मा गो वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी नागपूरमधील स्पंदन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी […]

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स
बातमी महाराष्ट्र

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबसह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी […]

आजपासून दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरवात; नागपूरऐवजी अधिवेशन मुंबईतच होणार
बातमी महाराष्ट्र

दिशा’च्या धर्तीवर ‘शक्ती’ आणि नराधमांना २१ दिवसात फाशी

मुंबई : आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातही ‘शक्ती’ कायदा लागू करण्यासाठी रविवारी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन विधेयके सादर केली. या विधेयकात महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. याला सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले. ”महिला व बालकांवरील […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
बातमी महाराष्ट्र

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस

मुंबई : मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी तुरळक पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे […]

हे भारतमाते मला माफ कर, म्हणत तिने संपवले जीवन
बातमी महाराष्ट्र

हे भारतमाते मला माफ कर, म्हणत तिने संपवले जीवन

पंढरपूर: देशासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरण असो वा कोपर्डी हत्याकांड महिलांवरील अत्याचाराच्या सर्व सीमा या आरोपींनी ओलांडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बघणाऱ्या पंढरपुरातील स्वप्नाली सत्यवान गाजरे या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शे‌ळवे गावात उघड […]

हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

वर्धा : हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने 3 फेब्रुवारी 2020 रोजी तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण ४० टक्के भाजली. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. तथापि, […]