लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य आणि ग्रामविकास विभागात आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. असेही यावेळी मंत्री टोपे यांनी […]

पाकिस्तानात हिंदू मंदीराची तोडफोड करून लावली आग; पाहा व्हिडिओ
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू मंदीराची तोडफोड करून लावली आग; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराची तोडफोड केल्यानंतर मंदिराला आगही लावण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात ही घटना घडली. मंदिराचा विस्तार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र या मुद्यावरुन काही मौलवींनी जमावाला भडकवलं. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. […]

सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी ‘या’ नावाची चर्चा
बातमी महाराष्ट्र

सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी ‘या’ नावाची चर्चा

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांची बदलीनंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी अनेक वरिष्ठ आयपीएस आधिकारी मैदानात आहेत. दरम्यान, सुबोधकुमार जयस्वाल यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल याबाबतच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून […]

मळेघरवाडी बलात्कारप्रकरणी शंभूराज देसाईंनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट
बातमी महाराष्ट्र

मळेघरवाडी बलात्कारप्रकरणी शंभूराज देसाईंनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

अलिबाग : पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. पेण येथील मळेघरवाडी येथे एका तीन वर्षांच्या बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. […]

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर
बातमी मुंबई

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

मुंबई : ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. ५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यां नागरिकांना मुंबई पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी नागरिकांना […]

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध
बातमी विदेश

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध

चीन मानो अथवा न मानो , परंतु संपूर्ण जगाला माहित आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली आहे. आजपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी चीनमधील खेड्यात एका डोंगराच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा गूढ आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती खाण चीनने कायमस्वरूपी बंद केली. जिथे आजही कोणालच जाण्याची परवानगी दिली जात नाही. काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी तिथे […]

आयटी रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ; पण…
देश बातमी

आयटी रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ; पण…

नवी दिल्ली : तुम्ही आयटी रिटर्न भरले नसेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अजुनही संधी गेलेली नाही. आयकर परतावा भरण्यास ३१ डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने […]

लग्नाचं वय झालं नसलं तरीही लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहता येणार; न्यायालयाचा निकाल
देश बातमी

लग्नाचं वय झालं नसलं तरीही लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहता येणार; न्यायालयाचा निकाल

चंदीगड : एखाद्या तरुणाचं लग्नाचं वय झालं नसलं तरी एकत्र राहता येणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. पण तो तरुण कायद्याने सज्ञान असायला हवा असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याला जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे, असल्याचा महत्त्वाचा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. भारतात तरुणांना वयाच्या 21 व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी […]

कशेडी घाटात मोठा अपघात; दरीत कोसळली बस
कोकण बातमी

कशेडी घाटात मोठा अपघात; दरीत कोसळली बस

रत्नागिरी : कशेडी घाटात मोठा अपघात झाल्याची घटना घडली असून ५० फूट खोल दरीत बस कोळली आहे. भोगाव येथे चिंतामणी ट्राव्हल्सची ही बस आहे. अपघातात सात वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून सुमारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गाडीतील बहुतेक […]

झाडाची पानं तोडल्याने मारहाण; दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
देश बातमी

झाडाची पानं तोडल्याने मारहाण; दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

फतेहपूर : झाडाची पानं तोडल्याने एका दलित तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये घडली आहे. आंब्याच्या झाडाची पानं तोडल्याने जमावाकडून मारहाण झालेल्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मारहाण झाल्याने हा तरूण अतिशय नाराज झाला होता, यामुळेच त्याने आत्महत्या […]