धक्कादायक! कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक! कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?

कोल्हापूर : कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच […]

वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा जागेवरच मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा जागेवरच मृत्यू

सोलापूर : वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने इशारा करूनही न थांबता, उलट पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीजवळ सोलापूर रस्त्यांवर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यात तो पोलीस शिपाई गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर वाळू वाहतुकीचा टेम्पो जागेवर न […]

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन
पश्चिम महाराष्ट्र बातमी

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे (वय ७२) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, डी एम बावळेकर, नितीन पाटील, राजूशेठ राजपुरे, विराज शिंदे आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन […]

सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांच्या विरोधात पोलीसात तक्रार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांच्या विरोधात पोलीसात तक्रार

सोलापूर : सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कैलास आढे यांनी कनिष्ठ लिपिक कुलदीप विभाते व तत्कालीन सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांच्याशी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यातील २०० बाधित विद्यार्थ्यांच्या सह्यांसह योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या आशयाची तक्रार एनजीओ नर्सिंग असोसिएशन सोलापूर जिल्हा […]

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…
पश्चिम महाराष्ट्र बातमी

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उसाच्या शेतात लपवलेला ५८ लाख रुपयांचा गांजा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ रुपये असावी. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज, रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तहसीलदार व वजन मापे […]

कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता

कोल्हापूर : बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात घडला आहे. मुरगूड येथील या बालकाचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, याप्रकरणाने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी मारुती […]

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज […]

राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम
पश्चिम महाराष्ट्र बातमी

राधानगरी धरणाचे उघडले चार दरवाजे; पुराचा धोका कायम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तथापि सायंकाळपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरु झाल्याने पुराची धास्ती वाढीस लागली आहे. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून, त्यात ७११२ क्युसेस विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला पुराचा […]

कोल्हापूकरांना सावधानतेचा इशारा; २१ व २२ जुलैला रेड अलर्ट
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूकरांना सावधानतेचा इशारा; २१ व २२ जुलैला रेड अलर्ट

कोल्हापूर : वेधशाळेच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्याला उद्या बुधवार पासून नागरिकांना तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान वेधशाळेने २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, २१ व २२ जुलै रोजी रेड अलर्ट व२३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या कालावधीमध्ये अति पाऊसमान (प्रतिदिन ७० ते १५० मि. मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. […]

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर पोलिसांची परवानगी धुडकावून रविवारी बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी सात आमदार, दोन खासदार आणि महापौरांसह ४६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींसह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख आयोजक किरण शंकर पवार (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) […]