पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. असं त्यांनी आवाहन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील कोरोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते अगदी व्हीआयपी व्यक्तींसह मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे १५ ते १७ मार्च या काळात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. ठाकरे यांचा हा दौरा पूर्णत: खासगी होता. मात्र या दौऱ्यात ताडोबात त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही.

रिसोर्ट कंपनीनेही या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र भाजपा आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सर्वांना माहिती झाली होती.