बातमी महाराष्ट्र

अनलॉकबाबत अद्याप निर्णय नाहीच; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलॉकबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारनेच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.

दरम्यान, राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नसल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.