दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव.. 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी
देश बातमी

दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव.. 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये भीषण अग्नी तांडव पहायला मिळत आहे. लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. अग्निशमनदलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही दिल्लीमधील सर्वात मोठी आग आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप घेतले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळात आहे.

अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाच मोठ्या कपड्यांची दुकाने आगीच्या विळख्यात आली असून यामध्ये बाटला हँडलूम, संगम साडी आणि रेमंड अशी तीन आणखी दोन मोठ्या दुकानांचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीत वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने विझवलेली आग पुन्हा पेटली आहे.