प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही
बातमी महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही

पुणे : बहुजन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो.” अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ”केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवण्याबाबत कोणतीही अशी ठोस उपाययोजना नाही. जर त्यांच्याकडे ती असती तर किंबहुना कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात नक्कीच यश मिळाले असते. नागरिक कोणता निर्णय घ्यावा यासंबंधात बोलतात. मात्र सरकार काही केल्या निर्णय घेण्यास तयार नाही. ते फक्त दुर्दैवाने आदेश काढत आहेत.”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ” आतापर्यंत पुणे, मुंबईसाठी महत्वाची असलेली लोक सुरु झाली पाहिजे होती. पण दुर्दैवाने सरकार याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेत निर्णय घेण्याची क्षमता दाखवत नाही कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असे मला वाटत नाही. असेही त्यानू यावेळी स्पष्ट केले.

एल्गार परिषदेसंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आयोजक ठरवतील. मात्र, आमचे आणि पी बी सावंत यांचे जे उद्दिष्ट होते, ते पूर्ण झाले आहे. कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले. 1 जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचे महत्व कायम राहील, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.