कोरोना संकटकाळात भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं, तेव्हा…
देश बातमी

कोरोना संकटकाळात भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं, तेव्हा…

नवी दिल्ली : ”कोरोनाच्या रुपानं देशावर मोठं संकट उद्भवलं, पण देशानं संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. जेव्हा भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं. तेव्हा भारतीयांच्या शिस्तीने देशाला संकटातून सावरलं,” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी १३० कोटी भारतीयांचं कौतूक केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान मोदी यांनी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोरोनाचा काळ भारतासाठी कलाटणी देणारा काळ होता. देश जगासमोर मजबूतपणे उभा आहे. नव्या काळात भारताला सामर्थ्यवान व्हावं लागेल. त्यासाठी आत्मनिर्भर भारत विचाराला ताकद देण्याची गरज आहे. प्रचंड लोकसंख्या असलेला देश कोरोनात कसा तग धरणार अशी भीती बोलली जात होती. पण, याचं श्रेय जात ते १३० कोटी भारतीयांना. ” असं म्हणत मोदी यांनी देशवासीयांचं कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ”देशांने संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. देश जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा जाताना ब्रिटिश म्हणत होते, भारत अनेक देशांचा महाद्वीप आहे आणि कुणीही या देशाला एकसंघ बनवू शकणार नाही. अशा घोषणा झाल्या होत्या. ज्यांच्या मनात अशी शंका होती, भारतीयांनी खोटी ठरवली. आज आपण जगासमोर आशेचा किरण म्हणून उभं आहोत. लोकशाही भारतीयांच्या नसानसात भिनली आहे. आपला देश विविधतेनं नटला असून, आपलं लक्ष देशाचा विकास आहे,” असं मोदी म्हणाले.

“कोरोना संकटात आम्ही बदल सुरु ठेवले. कृषी क्षेत्र कित्येक वर्षांपासून ज्या आव्हानांना सामोरं जात आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. त्या आव्हानांना आतापासून सामोरं जावं लागेल. येथे जी चर्चा झाली आहे आणि त्यातही काँग्रेसच्या सदस्यांकडून ते रंगावरुन चर्चा करत आहेत. भारतासारख्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं होतं. त्याचा परिणाम आज गाड्यांचा सेल मोठ्या प्रमाणात होत आहे. जीएसटी संकलनेदेखील वाढत आहे. ” असेही मोदींनी यावेळी म्हंटले आहे.