योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक
देश बातमी

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.२) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याच पार्श्वभूमीवर उद्या योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी यांचा समावेश आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री ते लखनऊहून मुंबईच्या दिशेने रवाना होती. उद्या सर्वात आधी २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा भेट देतील. त्यानंतर फिल्म सिटीसाठी बॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधणार आहेत. सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी लखनऊतही बैठक घेतली होती.

उद्या डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील. असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संप्टेबरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली होती. फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

तर दुसरीकडे, “उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,” अशा सांगत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला असून शंका व्यक्त केली आहे.