पुण्यात चोराचा पाठलाग करणार्‍या तरुणावर भरदिवसा गोळीबार
पुणे बातमी

पुण्यात चोराचा पाठलाग करणार्‍या तरुणावर भरदिवसा गोळीबार

पुणे : पुण्यातील खडकमाळ आळीत एका इमारतीमध्ये चोरी करणार्‍या आरोपीचा पाठलाग करणार्‍या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विठ्ठल वामन बोळे असे आरोपीचे नाव आहे. तर आवेज सलीम अन्सारी (वय-23) असे जखमी तरुणीचे नाव आहे. पोलिसांना त्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, खडकमाळ येथील एका सोसायटीत आवेज सलीम अन्सारी हे राहतात. ते दुपारी जेवण झाल्यावर टेरेसवर गेले होते. त्यानंतर त्यांना खाली येताना घराचा दरवाजा उघडा दिसला. तेवढ्यात जिन्यात अनोळखी व्यक्ती पळत जाताना दिसली. त्या व्यक्तीचा आवेज यांनी पाठलाग केला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेत आवेज सलीम अन्सारी हे जखमी झाले आहे. खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्ह्याचा तपास करीत आहेत.