तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश
राजकारण

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील, अशा आशयाचे ट्विट अमित शाह यांनी केले आहे. या नेत्यांच्या प्रवेशावेळी पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेस व सध्या भाजपात असलेले नेते मुकूल रॉय आणि भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे उपस्थित होते.