निवृत्त अधिकाऱ्यांच्या तोंडून शेतकरी आंदोलनास विदेशी कटाचा भाग ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न
राजकारण

निवृत्त अधिकाऱ्यांच्या तोंडून शेतकरी आंदोलनास विदेशी कटाचा भाग ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न

पुणे : दिल्ली सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत निवृत्त अधिकाऱ्यांकडून शेतकरी आंदोलनास विदेशी कटाचा भाग ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान काही बाबी स्पष्ट जाणवल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे. मा. पोलीस संचालक दिक्षीत यांनी किसान आंदोलनामध्ये अर्बन नक्सलींची शक्यता वर्तवून, धक्कादायक व बिनबुडाचे आरोप केल्यानंतर तिवारी यांच्याकडून काही प्रश्न करण्यात आले. हे निष्कर्ष कशाच्या आधारे काढले? या बाबत आपण स्वत: काय आवश्यक प्रतिबंधक प्रक्रिया केलीत हे प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केले आहेत.

त्याचबरोबर माजी अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवुन बोलण्याची अपेक्षा तिवारी यांनी केली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत दिक्षीत यांनी शेतकरी आंदोलनात बाहेरील शक्तींचा हात असल्याची आधारहीन व बिनबूडाची वक्तव्ये करून शेतकऱ्यांच्या प्रामाणिक लढ्याचा अपमान केला असून आपण त्याचा जाहीर निषेध करत माजी शासकीय अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारची लाचारी पत्करली आहे का असा सवाल तिवारी यांनी केला आहे. तसेच सध्या वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान शेतकरी आंदोलनांचे उद्देशच कलूषित करण्याच्या सत्ता-पक्षाच्या कट-कारस्थानात लोकशाहीचा ४था स्तंभ असलेले काही निवृत्त IAS आणि IPS अधिकारीदेखील बळी पडत असुन, सत्ताधारी पक्षाची लाचारी पत्करत आहेत. ही लोकशाहीची शोकांतिका असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

आपल्या प्रशासकीय काळातील मिळवलेल्या विश्वासार्हतेचा बाजार मांडणाऱ्या व स्वार्थ साधणाऱ्या अघिकाऱ्यांची सध्या सत्ताधारी पक्षाकडून चलती होत असल्याचा आरोप देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.