काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पहिला वार उपमुख्यमंत्र्यांवर
राजकारण

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पहिला वार उपमुख्यमंत्र्यांवर

मुंबई : नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणतं नाना पटोले यांची अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज्यपाल यांना बसवलेच नाही तर मग राज्यपाल यांना उतरवण्याचा मुद्दा येतो कुठे? गर्विष्ठपणाची भाषा भाजपला जास्त लागू होते. भाजपा ही राज्यपालांच्या मुद्दावर बोलते. पण राज्यातील महागाईवर भाजपा बोलत मुद्दाम बोलत नाही. तर असे मुद्दे काढून लक्ष विचलित करण्याचे काम राज्यातील विरोधी पक्ष नेते करीत आहेत.

ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणतं नाना पटोले यांची अजित पवार यावर टीका केली आहे.