पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्यावरून तसेच मागील काही वक्तव्यांवरून पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय, ओबीसी मोर्चाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती दिसल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कार्यकर्ते जे पक्षावरही प्रेम करतात व कधीकधी पक्षातील विशिष्ट नेत्यावर इतर नेत्यांच्या तुलनेत थोडं जास्त प्रेम करतात. तर, अशा काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, हा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना समजावताना काही शब्दांचा उपयोग केला असेल, पण त्याचा अर्थ त्या नाराज आहेत असं मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलाताना म्हणाले आहेत.

पंकजा मुंडे या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत आणि केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही त्या भाजपातच राहातील. भाजपामध्ये आपलं म्हणणं मांडणं म्हणजे नाराजी नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले असल्याचं सांगण्यात आलं आहे.