शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
राजकारण

शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

मुंबई : शिवसेनेनं विरोधी बाकांवरील भाजपला मुक्ताईनगरमध्ये राजकीय धक्का दिला. भाजपने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांसह चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कोल्हापूरात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप आणि एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपाला बुधवारी जोरदार धक्का दिला. भाजपच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रवेश केला. हा गिरीश महाजन आणि भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं दिलेल्या धक्क्याचा भाजपाने २४ तासांच्या आतच वचपा काढला. मुक्ताईनगरमध्ये खूश झालेल्या शिवसेनेची भाजपने माथेरानमध्ये परतफेड केली. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षांसह १० नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन तोडून भाजपाचे कमळ हाती घेतले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. एकाच वेळी दहा नगरसेवकांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपात प्रवेश केल्यानं माथेरानमधील सत्ताचित्रच बदललं आहे.

भाजपात प्रवेश केलेले १० नगरसेवक
१) आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष)
२) राकेश चौधरी
३) सोनम दाबेकर
४) प्रतिभा घावरे
५) सुषमा जाधव
६) प्रियांका कदम
७) ज्योती सोनवळे
८) संदीप कदम
९) चंद्रकांत जाधव
१) रुपाली आखाडे