विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अधिवेशनात काय झाले, वाचा सविस्तर
राजकारण

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अधिवेशनात काय झाले, वाचा सविस्तर

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली होती. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावल्यानंतर अजित पवार यांनीदेखील मला पडून दाखवा, असे म्हणत त्यांचे आव्हान स्वीकारले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचे झाले असे की, पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार आपले मुद्दे ठेवत असताना कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असं म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना मी तुमचं आव्हान मी स्वीकारतो मला पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं.

त्याला पुन्हा प्रत्युत्तर देत मुनगंटीवार म्हणाले की, जुलै महिन्यांत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजींचा वाढदिवस असतो. त्यामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्याचे विचार पुढे नेले पाहिजे असं राशीत लिहिलंय. माझ्यासमोर आज बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

दरम्यान, विधानसभेत आज 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेला 81 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रमशाळांसाठी 216 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाज्योती संस्थेला पैसे देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. ही मागणी पूर्ण करत ओबीसी समाजाची नाराजी दूर केली.

त्याचबरोबर मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने आक्रमक असलेल्या मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सारथी संस्थेला निधी मिळावा यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. तर पुरवणी मागण्यात इंदु मिलसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर पुरवणी मागण्यांमध्ये इतरही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनात निगेटीव्ह प्रेशर राखणारी वातनुकुलीत यंत्रणा बसवण्यासाठी 22 कोटी रुपयांची तरतूद, पिक नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2211 कोटी रुपयांची तरतूद, धान उत्पादकांना बोनस देण्यासाठी 2850 कोटी रुपये, आमदार निवास बंद असल्याने आमदारांच्या निवास व्यवस्थेसाठी 8 कोटींची तरतूद आणि आमदार विकास निधीसाठी 476 कोटींची तरतूद