ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ
क्रीडा

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार होती. पण हा दौरा सध्या तरी रद्द करण्यात आल्याने न्यूझीलंडला त्याचा फायदा झाला असून त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. १८ ते २२ जून दरम्यान कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार सध्या न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. या गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानी, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात खेळला जाणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा केवळ एकच कसोटी दौरा होता. पण तो दौरा रद्द झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. जून महिन्याआधी क्रिकेटच्या वेळापत्रकानुसार, भारत आणि इंग्लंड एकच कसोटी मालिका खेळणार आहेत. ती कसोटी मालिका ते एकमेकांविरोधातच खेळणार असल्याने न्यूझीलंडला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळण्यास मदत झाली आहे.

https://twitter.com/ICC/status/1356569152660635648/photo/1

भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. WTCच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असल्यास आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाला किमान दोन कसोटी सामने जिंकणं गरजेचं आहे. तसंच इंग्लंडला एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकण्यापासून रोखायचं आहे. या मालिकेचा निकाल ४-०, ३-०, ३-१, २-०, २-१ यापैकी काहीही आला तरी भारताचे अंतिम फेरीचे तिकीट पक्के होईल. पण मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने ४-०, ३-०, ३-१ यापैकी काहीही लागला तरी इंग्लंडसाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिका रद्द झाली असली तरी त्यांची WTCच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर गेलेले नाहीत. भारत-इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत सुटली किंवा अनिर्णित राहिली तर ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. याशिवाय, जर भारत दोनपेक्षा जास्त सामने हारला आणि इंग्लंडला तीनपेक्षा जास्त सामने जिंकता आले नाहीत तरीही कांगारूंना अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.