दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना फार वेळ लागला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

श्रीलंकेने २ बाद ६५ धावसंख्येवर मंगळवारी डावाला सुरुवात केली. परंतु ४६.१ षटकांत १८० धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला. अष्टपैलू धनंजय डीसिल्व्हा फलंदाजीला उतरू शकला नाही. श्रीलंका संघाकडून या सामन्यात कुसल परेरा याने 87 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तर हसरंगा 53 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी करत पराभवाचे अंतर कमी केले. इतर सहा खेळाडूंना दुहेरी धावसंख्या सुद्धा गाठू शकले नाहीत. यापैकी चार खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे श्रीलंका संघाचा मोठ्या फरकाने पराभव झाला. लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, विआन मुल्डर आणि लुथो सिपाम्ला यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

पहिल्या डावात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या श्रीलंकेला चार जणांना झालेल्या दुखापतींच्या मालिकेने हादरवले आहे. हे सामने विश्व कसोटी चॅम्पियनशिपचे भाग आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला या विजयामुळे 60 गुणांचा फायदा झाला आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा आणि शेवटचा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जाईल. या सामन्याला 3 जानेवारी पासून सुरुवात होईल.