धक्कादायक ! उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेची संरपंचपदी निवड
देश बातमी

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेची संरपंचपदी निवड

लखनौ : योगी अदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मूळची पाकिस्तानी असणारी एक महिला इटा येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगमी ग्रामप्रधान (सरपंच) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव बानो बेगम असं असून ती मूळची कराचीची आहे. बानो या मागील ४० वर्षांपासून भारतात राहत आहेत. बानो […]

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….
देश बातमी

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….

लखनऊ : तुमच्या कोणत्याही वाहनांवर जर एखादा जातीवाचक शब्द लिहिलेला असेल तर तो लगेच काढून टाका. नाहीतर तत्काळ हटवा, अन्यथा तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्या गाडीवर खान, यादव, क्षत्रिय, पंडित, राजपूत, मौर्य, जाट यांसारख्या जातिसूचक शब्दांचा वापर केलेला असेल तर तुमची गाडी जप्तही केली जाऊ शकते. याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेश सरकारने जातिसूचक […]

हायकोर्टाचा योगी सरकारला दणका; योगीराजला जंगलराज म्हणणे हा गुन्हा नाही
देश बातमी

हायकोर्टाचा योगी सरकारला दणका; योगीराजला जंगलराज म्हणणे हा गुन्हा नाही

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात गुन्हेगारीची पातळी शिगेला पोहचली आहे. महिलांवरील बलात्कार आणि हत्येच्या घटना रोज पाहायला मिळत आहेत. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश हे रामराज्य म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात जंगलराज स्थापन झाल्याचे भाष्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय […]

ज्या गोदी मीडिया ने तबलिगींना कोरोना पसरविण्यासाठी धरले जबाबदार; तेच आता शेतकऱ्यांना….
राजकारण

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपा’चे अनोखी रणनिती; गावागावात, चौकाचौकात शेतकऱ्यांची चर्चा करा

नवी दिल्ली : मोदी सरकारला नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून चारही बाजूने घेरण्यात आले आहे. पंजाबनंतर हरियाणा, दिल्ली, यूपीसह देशभरातील शेतकरी विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, उत्तरप्रदेशात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी तेथील पोलीस अत्यंत कठोर वागणूक देत आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना […]

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…
देश बातमी

गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता; तर उत्तरप्रदेशात…

पणजी : नाताळ सणाला काहीच दिवस उरले असताना गोव्यात गोमांसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ”गोमांसाचा पुरवठा वाढेल कसा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हंटले आहे. गोव्यात […]

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू
देश बातमी

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू

लखनौ : वरातीत डीजेवर सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील जनपद येथे घडली आहे. एका लग्न समारंभामध्ये लोकप्रिय गायिका सपना चौधरीचे गाणं लावलं नाही म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या तरुणाचा मृत्यू झाला. लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर […]

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
देश बातमी

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

झाशी (उत्तरप्रदेश) : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यात घडली असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यामधील इलाइट चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र आंदोलनाला सुरुवात करण्याआधीच या चौकात लावण्यात आलेल्या नेहरुंच्या पुतळ्याचे विटंबन झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. […]

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर
राजकारण

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर

मुंबई : ”उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं.” असे सांगत मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आज अखेर उत्तरप्रदेशातील फिल्मसिटीची अधिकृत घोषणा केली. मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि […]

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा
राजकारण

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा

मुंबई : “मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? कि त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय ?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. तसेच, योगी आदित्यनाथ […]

उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू
देश बातमी

उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू

लखनौ : रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर वाळूचा ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातामध्ये आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून […]