देश बातमी

चर्चेही दहावी फेरीदेखील निष्फळ; २६ जानेवारीला रॅली काढण्यावर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आज झालेली चर्चेही दहावी फेरी देखील निष्फळ ठरली. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात, दिल्लीच्या सीमेवर मागील ५५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता पुढील बैठक २२ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. तर दुसरीकडे शेतकरी […]

शेतकरी आंदोलनाबाबत अमेरिकेच्या सात संसद सदस्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनाबाबत अमेरिकेच्या सात संसद सदस्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रसरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. मात्र केंद्रसरकार केवळ चर्चेच्या फेऱ्या घेऊन कोणताही ठोस निर्णय घेत नाहीये. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आंदोलन करत असताना आता अमेरिकेनेही या आंदोलनाची दखल घेतली आहे. अमेरिकेतील सात प्रभावी काँग्रेस सदस्यांनी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना पत्र लिहिलं असून हा मुद्दा भारतासमोर उपस्थित […]

कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार केले नाहीत ; नरेंद्र मोदी
राजकारण

कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार केले नाहीत ; नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : “मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं. मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचं […]

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ
देश बातमी

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

चंदीगढ : शेतकरी आंदोनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकरी संघटनांसह, खेळाडू, कलाकार, उद्योजक, राजकीय पक्ष असे अनेकजण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. काही खेळाडूंनी तर केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. यात आता पोलीसांचीही साथ मिळताना दिसत आहे. मात्र आता ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबचे डीआयजी लखविंदरसिंह जाखड यांनी नोकरीवर लाथ मारली […]

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला
राजकारण

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला

मुंबई : ”दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, […]

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही
देश बातमी

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही

नवी दिल्ली : “सरकार जर हट्टाला पेटलं असेल तर आम्हीही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. शेतकरी कायद्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या सन्मानाशी निगडीत विषय आहे. अशावेळी या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. सरकारने कायद्यात बदल करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. पण कायदे पूर्णपणे मागे घेण्याची आमची मागणी आहे” , असं भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकरी संघटनांचा भारत बंद’ला विरोध; कारण …
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकरी संघटनांचा भारत बंद’ला विरोध; कारण …

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद ची हाक दिली आहे. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. या बंदचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. आजच्या भारतबंदला राज्यातील स्वाभिमानी […]

#शेतकरीआंदोलन : राष्ट्रपती भवनात पुरस्कार परत करायला निघाले होते खेळाडू; पण…
क्रीडा देश बातमी

#शेतकरीआंदोलन : राष्ट्रपती भवनात पुरस्कार परत करायला निघाले होते खेळाडू; पण…

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. देशभरातील राजकीय पक्षांपासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत या आंदोलनाला पाठींबा मिळत आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे या आंदोलनात खेळाडूंनी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे. या आंदोलनाला खेळांडूनी पाठिंबा दिला असून आपला पुरस्कार परत करण्यासाठी काही माजी खेळाडूंनी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु राष्ट्रपती भवनकडून राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ […]

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार
देश बातमी

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार

नवी दिल्ली : ”खूप झाली चर्चा, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही’ असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी काल शेतकरी प्रतिनिधींनी पाचव्यांदा सरकारसोबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार टाळाटाळ करीत केवळ वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी चांगलेच संतापले. त्यामुळे चर्चेची पाचवी […]

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या वेशीवरच गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. संपूर्ण देशभरात या आंदोलनाची चर्चा होत आहे. मात्र आता येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली असून देशातील सर्व टोल बंद करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यापूर्वी मोदी सरकारच्या निषेधार्थ ५ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे पुतळेदेखील जाळणार आहोत. अशी माहिती पत्रकार परिषदेत […]