रोहित-गिलचा पराक्रम! तब्बल ११ वर्षांनी केला हा विक्रम
क्रीडा

रोहित-गिलचा पराक्रम! तब्बल ११ वर्षांनी केला हा विक्रम

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघे माघारी परतले. पण या दोघांनी एक पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा शुबमन गिलसोबत मैदानावर आला. या दोघांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ करत […]

जबरदस्त ! चेंडू जडेजाच्या हातात अन् स्मिथ तंबूत; व्हिडिओ पाहाच
क्रीडा

जबरदस्त ! चेंडू जडेजाच्या हातात अन् स्मिथ तंबूत; व्हिडिओ पाहाच

सिडनी : स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते, पण दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखले. रविंद्र जाडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. पण त्याने स्मिथला रन आऊट केल्याची जास्त चर्चा रंगली. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन दोघे चांगला […]

स्मिथच्या शतकी पारीच्या जोरावर कांगारुंची पहिल्या डावात त्रिशतकी मजल
क्रीडा

स्मिथच्या शतकी पारीच्या जोरावर कांगारुंची पहिल्या डावात त्रिशतकी मजल

सिडनी : स्टिव्ह स्मिथची शतकी खेळी आणि लाबुशनच्या ९१ धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. पदार्पण करणाऱ्या पुलोव्हस्कीनं संयमी ६२ धावांची खेळी केली. रविंद्र जाडेजा-बुमराह यांच्या भेदक माऱ्यापुढे दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. स्मिथच्या १३० धावांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत. ३३८ धावांचा […]

सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु होताच सिराजला कोसळले रडू; पाहा व्हिडिओ
क्रीडा

सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु होताच सिराजला कोसळले रडू; पाहा व्हिडिओ

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर राष्ट्रगीत सुरु होता भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद सिराजला रडू कोसळले. मोहम्मद सिराजच्या करिअरमधील हा दुसरा टेस्ट सामना आहे. गुरूवारी सामना सुरू होण्याअगोदर तो भरपूर इमोशनल झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ✊ #AUSvIND pic.twitter.com/4NK95mVYLN — cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021 […]

मराठमोळ्या खेळाडूला गवसला सूर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात झळकावलं शतक
क्रीडा

अजिंक्यच्या नेतृत्वात आतापर्यंत १० जणांनी केलं पदार्पण; नावे एकदा पाहाच

सिडनी : कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं मोजक्याच सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आतापर्यंत तब्बल १० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. २०१५ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या संघाची धुरा रहाणेच्या खांद्यावर होती. रहाणेच्या नेतृत्वात मनीष पांडेने पहिल्यांदा पदार्पण केले होते. पांडेने त्या […]

पंतने झेल घेतला; भारतीय खेळाडूंनी जल्लोषही केला, पण…
क्रीडा

पंतने झेल घेतला; भारतीय खेळाडूंनी जल्लोषही केला, पण…

सिडनी : भारत ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यात एक प्रसंग घडला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चेंडू उसळून ऑस्ट्रेलियन फलंदाज सलामीवीर विल पुकोव्हस्कीच्या खांद्याजवळ आला. पुकोव्हस्कीने बॅट फिरवत चेंडू टोलवला पण चेंडू हवेत उंच उडला. चेंडू वर जाताच यष्टीरक्षक ऋषभ पंत झेल घेण्यासाठी हवेत झेपावला. उडी मारत त्याने झेल घ्यायचा प्रयत्न केला, पण चेंडू हाताला लागून बाजूला गेला. […]

आता रहाणेची कसोटी; तिसऱ्या कसोटी पहिल्या दिवसअखेर कांगारू भारी
क्रीडा

आता रहाणेची कसोटी; तिसऱ्या कसोटी पहिल्या दिवसअखेर कांगारू भारी

सिडनी : दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जीवावर भारताने बाजी मारली होती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेची कसोटी लागणार असून पहिल्या दिवसी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोव्हस्की (६२) यांनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या आहेत. दिवसअखेर लाबुशेन […]

तिसऱ्या कसोटीत ‘हा’ गोलंदाज करणार कसोटी पदार्पण; भारतीय संघ जाहीर
क्रीडा

तिसऱ्या कसोटीत ‘हा’ गोलंदाज करणार कसोटी पदार्पण; भारतीय संघ जाहीर

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यात युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपलं कसोटी पदार्पण करणार आहे. सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर खात्यावर संघाची घोषणा केली आहे. अनुभवी रोहित शर्माचंही पुनरागमन झालं आहे. अनुभवी उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी तिसरा वेगवान गोलंदाज कोण? याबाबत गेल्या काही दिवसांपासून […]

मोठी बातमी : भारताची चिंता मिटली, रोहित फिट; मात्र ही आहे अडचण
क्रीडा

रोहित शर्मा खेळणार ‘या’ क्रमांकावर; अजिंक्य रहाणेकडून स्पष्टोक्ती

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मयांक अगरवालला आराम देण्यात आला असून त्याच्याजागी रोहित शर्माची संघात एण्ट्री करण्यात आली आहे. भरातीय संघात एकूण दोन बदल करण्यात आले आहे. रोहित शर्माव्यतिरिक्त नवदीप सैनीचीही निवड करण्यात येणार आहे. रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार […]

ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; दुखापतीमुळे महत्वाचा गोलंदाज संघाबाहेर
क्रीडा

ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; दुखापतीमुळे महत्वाचा गोलंदाज संघाबाहेर

सिडनी : दुसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. महत्वाचा गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला आराम देण्यात आला आहे. जेम्स पॅटिन्सन बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेम्स पॅटिन्सन कुटुंबासोबत […]