करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय

मुंबई: परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या करोनाप्रतिबंधक निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमावलीत असलेली तफावत दूर केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. […]

टेन्शन वाढले! ‘त्या’ देशांमधून आलेले आणखी ४ जण आढळले करोना पॉझिटिव्ह
कोरोना इम्पॅक्ट

टेन्शन वाढले! ‘त्या’ देशांमधून आलेले आणखी ४ जण आढळले करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्लीः करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनचा धोका वाढला असताना भारतानेही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व खबरदारी घेतली आहे. आता दिल्ली विमानतळावरून ताजी माहिती येत आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी ४ जण करोना पॉझिटिव्ह ( omicron india ) आढळून आले आहेत, अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. भारताने […]

करोना: राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र बरे होणारे रुग्ण वाढले
कोरोना इम्पॅक्ट

करोना: राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र बरे होणारे रुग्ण वाढले

मुंबई: राज्यात आज मंगळवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसख्येत वाढ झाली असून एकूण सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट झाली आहे. तसेच, आज मृत्युसंख्येतही घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ७६७ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. […]

पुण्यात धोका वाढला! नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक करोना पॉजिटीव्ह
कोरोना इम्पॅक्ट

पुण्यात धोका वाढला! नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक करोना पॉजिटीव्ह

पिंपरी-चिंचवड: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरला. जगातील १५ देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतात सुद्धा केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळाल्या सुचनेनुसार, ओमायक्रॉन विषाणूला तोंड देण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या लोकांची […]

धक्कादायक! दक्षिण आफ्रिकेतील ‘त्या’ करोनाग्रस्त प्रवाशासोबत होता आणखी एक डोंबिवलीचा प्रवासी, केडीएमसी सतर्क
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक! दक्षिण आफ्रिकेतील ‘त्या’ करोनाग्रस्त प्रवाशासोबत होता आणखी एक डोंबिवलीचा प्रवासी, केडीएमसी सतर्क

डोंबिवली: दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या ३२ वर्षीय रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असून अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. केडीएमसीकडून त्याच्या कुटुंबीयांची देखील टेस्टिंग करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट […]

ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लस किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली ‘ही’ आनंदाची बातमी
कोरोना इम्पॅक्ट

ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लस किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली ‘ही’ आनंदाची बातमी

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच कोविडवरील उपलब्ध लसपैकी कोणती लस सर्वात प्रभावी ठरू शकते, याची चाचपणी सुरू झाली असून सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या काही आठवड्यांत सर्वांसाठीच आनंदाची बातमी देण्याचे संकेत पूनावाला यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा […]

जगाला हादरा! दक्षिण आफ्रिकेच्या ‘वुहान’मध्ये रुग्णसंख्येत ३३० टक्क्यांनी वाढ
कोरोना इम्पॅक्ट

जगाला हादरा! दक्षिण आफ्रिकेच्या ‘वुहान’मध्ये रुग्णसंख्येत ३३० टक्क्यांनी वाढ

केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’नं जगभरात टेन्शन वाढवलं असतानाच आता आणखीन धक्कादायक माहिती समोर आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या ज्या प्रांतात ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट सर्वात पहिल्यांदा आढळून आला होता, त्या भागातील रुग्णालयांत रुग्णसंख्येत तब्बल ३३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर येतंय. ही जगाला हादरा देणारी गोष्ट आहे. गाँटेग प्रांत ठरतोय दक्षिण आफ्रिकेतील ‘वुहान’ दक्षिण आफ्रिकेच्या गाँटेग […]

लसीसाठी आम्ही पैसे मोजतो, मग मोदींचा फोटो कशाला?
कोरोना इम्पॅक्ट

लसीसाठी आम्ही पैसे मोजतो, मग मोदींचा फोटो कशाला?

नवी दिल्ली: कोरोनाच्या लसीसाठी आम्ही पैसे खर्च करतो, मग लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कशाला? असा सवाल करीत केरळच्या नागरिकाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. लसीच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्यात यावा, अशी विनंती आरटीआय कार्यकर्ते पीटर म्यालीपराम्बिल यांनी केला आहे. व्यक्तिगत लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापणे म्हणजे आमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. सरकारी लसीकरण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ७१६ जण कोरोनामुक्त; ४१ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण कोरोनामधून बरे झाले असून २ हजार ६९२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ८० हजार ६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२८ टक्के एवढे झाले आहे. […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २३ हजार ५२९ नव्या रुग्णांची भर; ३११ मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २३ हजार ५२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ हजार ०२० झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८ वर पोहोचली […]