अपघातांची मालिका सुरुच; पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पाच वाहनांची धडक, पाच ठार
बातमी मुंबई

अपघातांची मालिका सुरुच; पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पाच वाहनांची धडक, पाच ठार

पुणे : राज्यातील अपघातांची मालिका सुरुच असून पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर ५ वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाले आहेत. वाहनांनी एकमेकांना धडक बसून हा अपघात झाला आहे. अपघाता पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पुण्याकडुन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरघाट उतरताना फुडमॉलजवळ हा अपघात झाला. कंटेनरने इतर चार वाहनांना […]

मुंबईत वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओचं शुटिंग; अभिनेत्रीला अटक
बातमी मुंबई

मुंबईत वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओचं शुटिंग; अभिनेत्रीला अटक

मुंबई : मुंबईत वेब सिरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओचं शुटिंग होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली […]

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १४ जखमी
बातमी मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १४ जखमी

मुंबई : डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता १४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रात्री साडे बाराच्या सुमारास प्रवासी घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चारोटी टोल नाक्यावर […]

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्या म्हणून वृद्धाची आत्महत्या
बातमी मुंबई

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्या म्हणून वृद्धाची आत्महत्या

विरार : कुत्र्याने कोंबड्या खाल्या म्हणून वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका ६० वर्षीय वयोवृद्धाने केवळ घरातील कोंबड्या कुत्र्यांनी खाल्ल्या म्हणून तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भात नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पश्चिम येथील गास गावात राहणारे थॉमस रूमव (६०) हे टाळेबंदीच्या अगोदर वाद्य […]

दिवसभराच काम संपवून ‘ती’ हॉटेलच्या वॉशरूममध्ये गेली होती, आणि…
बातमी मुंबई

दिवसभराच काम संपवून ‘ती’ हॉटेलच्या वॉशरूममध्ये गेली होती, आणि…

मुंबई : दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिला अभिनेत्रीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री हॉटेलमध्ये एका वेब सीरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राहत होती. तिचं दिवसभरातील […]

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु; फक्त ‘या’च वेळेत करता येणार प्रवास
बातमी मुंबई

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु; फक्त ‘या’च वेळेत करता येणार प्रवास

मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल अखेर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विशिष्ट […]

अर्णबने मला दिले एवढे पैसे; पार्थो दासगुप्तांचा लेखी जवाबात दावा
बातमी मुंबई

अर्णबने मला दिले एवढे पैसे; पार्थो दासगुप्तांचा लेखी जवाबात दावा

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून १२ हजार डॉलर मिळाले होते. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये त्यांना एकूण ४० लाख रुपये मिळाले, ज्यासाठी त्यांना रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटींगमध्ये फेरफार करायची होती. असा दावा बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जवाबात […]

शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो; मुंबई हायकोर्ट
बातमी मुंबई

शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो; मुंबई हायकोर्ट

मुंबई : ”लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तसेच, “अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही”, असंही […]

शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे; तर मुख्यमंत्र्यांनी मोर्च्यात सहभागी न होण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला
बातमी मुंबई

शेतकरी मोर्चा आज राजभवनाकडे; तर मुख्यमंत्र्यांनी मोर्च्यात सहभागी न होण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला

मुंबई : किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदान येथे दाखल झाला. आज हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फिरवला चौकशीचा आदेश; मंत्रालयातील धक्कादायक प्रकार!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनंतरही चौकशीचा आदेश फिरवला असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]