निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा
राजकारण

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश […]

वीजबिल प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
राजकारण

वीजबिल प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा

मुंबई : “कोविड-१९ च्या काळात मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्येही ५० टक्के सूट दिली, मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे? जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचं उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या!” असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर  जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात सध्या […]

संजय राऊतांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; मुलगी पुर्वशीचा साखरपुडा समारंभ थाटात साजरा
राजकारण

संजय राऊतांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; मुलगी पुर्वशीचा साखरपुडा समारंभ थाटात साजरा

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा समारंभ नुकताच पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा […]

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच
राजकारण

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच

मुंबई : रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याही माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचंही शंभुराज म्हणाले. तर तर या प्रकरणी तपास होऊन दोषींवर योग्य ती […]

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार
राजकारण

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर आले आहे. अशातच आता महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीने आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या […]

शेतकरी आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
राजकारण

शेतकरी आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. देशभरातील अनेक नेत्यांनी, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ”सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. […]

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं […]

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…
राजकारण

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…

अहमदनगर : “प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी मिश्कील टिप्पणी करताच नगरच्या सभेत हशा पिकला. अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, […]

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…

मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो […]

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल
राजकारण

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र शुक्रवारीच(ता. २९) त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण […]