महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून करोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, “महाराष्ट्रात 12 मार्चपर्यंत 52 लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचं दिसत आहे.” तसेच, “आधी महामारीवर नियंत्रण मिळवताना नियोजनाचा अभाव आणि आता लसीकरणामध्ये वाईट कामगिरी,” असा टोला महाराष्ट्र सरकारच्या काराभारावर नाराजी व्यक्त करताना लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अधिक लसींचा पुरवठा व्हायला हवा, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत म्हटलं. तर काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेतली. राज्यात एक कोटी 77 लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, 45 वर्षावरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना 2 कोटी 20 लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत. सध्या रोज सव्वा लाख नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. मात्र आठवड्याला 20 लाख डोसेसची गरज आहे. त्यावेगाने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकार नक्की मदत करेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला.