दिल्लीत शेतकऱ्यांचे आज पुन्हा एक दिवसीय उपोषण; तर केंद्राकडून पुन्हा चर्चेचे निमंत्रण
देश बातमी

दिल्लीत शेतकऱ्यांचे आज पुन्हा एक दिवसीय उपोषण; तर केंद्राकडून पुन्हा चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आज पुन्हा चर्चेच चर्चेचं निमंत्रण पाठवलं असून बाततीचसाठी आपल्या सोयीनुसार तारीख निश्चित करण्यास सांगितलं आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत नाहीत तोपर्यत शेतकरी माघार घेणार नाहीत, अशी घोषणाच शेतकऱ्यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, ” 23 डिसेंबरला म्हणजेच शेतकरी दिवसाला एक दिवसाचा उपवास करावा. तर “सोमवारी (21 डिसेंबर) सर्व आंदोलनस्थळांवर शेतकरी एक दिवसांचं उपोषण करणार आहेत. याची सुरुवात इथल्या आंदोलनस्थळांवर 11 सदस्यांचा एक ग्रुप करेल.” अशी माहिती स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी दिली.

त्याचबरोबर, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी या संदर्भात शेतकरी संघटनांना पत्र लिहिलं आहे. या पत्रानुसार, केंद्रसरकारकडून शेतकरी संघटनांना रविवारी (20 डिसेंबर) पुन्हा एकदा चर्चेचं निमंत्रण दिलं. सरकारने चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनांना त्यांच्या सोयीनुसार तारीख निश्चित करण्याचं आवाहन केलं आहे.

तसेच, “शेतकरी 25 ते 27 डिसेंबरपर्यंत हरियाणातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करु देणार नाही. अशी माहिती शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाला यांनी दिली आहे. तर, ”नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी 23 डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा करणार आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो ती या दिवशी त्यांनी दुपारचं जेवण बनवू नये” असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले आहे.