पुण्यात शिवसेनेला मोठा झटका; महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

पुण्यात शिवसेनेला मोठा झटका; महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुण्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. १५ वर्षापासून शिवसेनेत असलेल्या आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचके यांचा पक्षप्रवेश झाला. या पार्श्वभूमीवर आगामी २०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या आमदार भाजपाचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या निवडणुकीत भाजप स्वत:च्या भरवशावर सत्तेत येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, आज आशाताईंचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. याला पुनर्प्रवेश म्हणायचं की स्वगृही प्रवेश म्हणायचं हा प्रश्न आहे. पण त्या घर सोडून गेल्या नव्हत्या. भाजपचे मुंबईमध्ये काम करतांना आपल्या गावी गेल्यानंतर तो सर्व भाग तेव्हाच्या युतीमध्ये शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी शिवसेनेचं काम केलं. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्या म्हणून त्यांनी आपला जम बसवला. जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी आपली प्रतिमा तयार केली. विधानसभेच्या तीन निवडणुका त्या लढल्या आणि तिन्हीवेळी घात झाल्यामुळे विधानसभेवर त्या निवडून जाऊ शकल्या नाहीत. जनतेच्या मनामध्ये त्यांना निवडून द्यावं, असं होतं. मात्र त्यावेळी राजकीय गणितं त्यावेळी वेगळी बसवण्यात आली होती, असेही फडणवीस म्हणाले.

पक्षप्रवेशाच्या चर्चेवळी मला २०२४चं तिकीट द्याल का, अस आशाताईंनी विचारलं नाही. त्यासंदर्भात आग्रह धरला नाही. फक्त कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सन्मानाची जागा मिळेल की नाही, स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळेल की नाही, ऐवढा त्यांचा प्रश्न होता. मी त्यांना आश्वस्त केलं भाजपामधे आतला-बाहेरचा, जूना-नवा, असा काही विषय नाही, असेही फडणवीस म्हणाले.