महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
राजकारण

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात योग्यवेळी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. याच संदर्भात आज (ता. ०२) भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रावसाहेब दानवे म्हणाले, ही ती वेळ नाही. करेक्ट कार्यक्रम याचा अर्थ येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत. ज्याला जनतेतून निवडून यावं लागतं मग, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभेची पोटनिवडणूक असो. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आम्ही करेक्ट कार्यक्रम केला. वेळेला बंधन नसतात. तारीख दिली नव्हती, जेव्हा जेव्हा निवडणूक होतील तेव्हा दाखवून देऊ राज्यात आमची काय ताकद आहे ती. देलगूरच्या पोटनिवडणुकीत दाखून देऊ ताकद त्याला म्हणतात करेक्ट वेळ.

तीन पक्ष एकत्र आहेत विधानसभा अध्यक्ष्यपदासाठी त्यांचं संख्याबळ आहे. त्यांनी निवडणूक घ्यावी, हा आकड्यांचा खेळ आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी ही आमची इच्छा आहे. भाजप उमेदवार देणार नाही असे मी म्हटले नाही असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.