किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
राजकारण

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवली आहे, असा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे सोमय्या यांनी ही तक्रार केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. तसेच, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून ही संपत्ती लपवल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. तसेच आम्ही केलेली तक्रार निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठवण्याचं बलदेव सिंह यांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

सोमय्यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला घोटाळ्यांवरून घेरले आहे. मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने जप्त केलेली 78 एकर जमीन, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची भागिदारी असलेली महाकाली गुंफेची जमीन बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव, मुंबई महापालिकेने दहिसर येथील 2.55 कोटीचा भूखंड बिल्डरला 349 कोटीला दिला, पाच हजार बेडवाल्या 12 हजार कोटीच्या रुग्णालयाच्या घोटाळ्याचे पुरावे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तथापि, सोमय्या यांच्या या आरोपावर अद्याप शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच, किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती देताना आपल्या बेनामी संपत्तीची माहिती लपवली. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. अन्वय नाईक यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे मोठे आर्थिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची 23 हजार 500 चौरस फूटांची 19 घरं आहेत. ही एकूण 5.29 कोटींची बेनामी मालमत्ता आहे.” असाही आरोप त्यांनी यावेळी केला होता.