भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे राहुल गांधीनी आपल्या आजोबांना विचारावे
राजकारण

भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे राहुल गांधीनी आपल्या आजोबांना विचारावे

नवी दिल्ली : “भारताची भूमी चीनला कोणी दिली ? हे काँग्रेस नेत्याने आपल्या आजोबांना (नेहरुंना) विचारावे. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हे त्यांना समजेल. लोकांना सर्व काही माहित आहे.” असे म्हणत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या आरोपांना उत्तर दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर, राहुल गांधी यांच्या विधानातून असंसदीयपणा आणि परिपक्तवतेचा अभाव दिसून येतो. त्यांना काही समजत नाही आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाहीत” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आर.के.सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, “पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत” अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला” असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

तसेच, पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या भागातून भारत आणि चीन दोघांकडून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु असताना राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. “पँगाँग टीएसओमधील फिंगर फोरपर्यंत भारताची हद्द आहे. असे असताना, सैन्याला फिंगर तीन पर्यंत जाण्यास का सांगण्यात आले?” असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी भारताची भूमी चीनला दिली हे स्पष्ट होते असे राहुल म्हणाले.