क्रीडा

ICC RANKINGS : मिताली पुन्हा अव्वल; स्मृती मंधानालाही पहिल्या दहामध्ये स्थान

मुंबई : भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान मिळवले आहे. काल (ता. २०) जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत मितालीने ही कामगिरी केली. आता मितालीचे ७६२ रेटिंग गुण झाले आहेत. भारतीय कर्णधार आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकीर्दीत नवव्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. १६ वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले […]

क्रीडा

शेवटच्या षटकात ३५ धावांची गरज, मग ठोकले ६ षटकार

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत अनेक फलंदाजांनी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले आहेत. पण, पहिल्यांदाच एक पराक्रम आयर्लंडच्या जॉन ग्लासने केला आहे. गुरुवारी क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान त्याने एका षटकात सहा षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा सामना नॉर्दर्न आयरिश क्लब […]

क्रीडा

महामुकाबला ! वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान येणार आमने सामने!

नवी दिल्ली : आयसीसीने आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात असल्याने आमने सामने येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. […]

क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतनंतर आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान पंत त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर […]

क्रीडा

बाबर आझमची दिडशतकी खेळी वाया; इंग्लंडकडून पाकिस्तानला क्लिन स्वीप

नवी दिल्ली : इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला ३ गडी आणि १२ चेंडू राखून पराभूत करत मालिकेत ३-० अशी क्लिन स्वीप दिली आहे. ॉपाकिस्ताननं ५० षटकात ३३१ धावांचा डोंगर रचत इंग्लंडसमोर ३३२ धावांचं आव्हान दिलं होतं. विजय सहज शक्य आहे असं पाकिस्तानच्या फलंदाजीनंतर वाटत होतं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि सामना ३ […]

क्रीडा

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला आफ्रिकेच्या अमलाचा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विक्रम मोडणारे शतक ठोकले. आझमने १३९ चेंडूत १५८ धावा केल्या आणि अनेक […]

क्रीडा

भारत-श्रीलंका सामन्यांच्या बदलल्या वेळा; पाहा नवीन वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत-श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या नवीन वेळा जाहीर केल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले, की भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातील वनडे आणि टी-२० मालिका श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या शिबिरात कोरोनाच्या उद्रेकानंतर स्थगित करण्यात आली आहे. मात्र, ही मालिका रद्द केली गेली […]

क्रीडा

ख्रिस गेलची मोठा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ख्रिस गेलने टी -२० क्रिकेट सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या टी -२० सामन्यात गेलने ३८ चेंडूत ६७ धावा केल्या. या दरम्यान गेलने सात षटकार आणि चार चौकार लगावले. ९व्या षटकात अ‍ॅडम झॅम्पांच्या पहिल्या चेंडूवर लाँग ओव्हरवर षटकार ठोकला आणि या मोठ्या शॉटसह त्याने […]

क्रीडा

विश्वकरंडक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या भारतीय क्रिकेटपटूचे निधन

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती. शर्मा यांनी भारताकडून यशपाल शर्मा यांनी ३७ कसोटी सामन्यांमध्ये १६०६ धावा केल्या आहेत. यात १४० धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये […]

क्रीडा

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांची हकालपट्टी केली आहे. जॉर्ज अल्लार्डिस त्यांच्या जागी कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. साहनी यांच्यावर सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ऑडिट फर्म प्राइसवाटर हाऊस कूपर्सच्या अंतर्गत झालेल्या तपासणीत मनू साहनी यांचे प्रकरण समोर आले. त्याचा कार्यकाळ २०२२मध्ये संपुष्टात येणार होता. त्यांच्यावर बरेच […]