शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
देश बातमी

Delhi Farmer Protest : …तर उपमुख्यमंत्री देणार राजीनामा

चंदीगढ : हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चौटाला यांनी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सुरू असलेल्या वादावर मौन सोडलं आहे. चौटाला यांनी माझ्यासाठी सदैव शेतकरी सर्वप्रथम आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी एमएसपी मिळाली नाहीतर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल. यामुळे आता हरियाणामधील भाजप […]

#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
देश बातमी

शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम; चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने आंदोलन चिघळणार

नवी दिल्ली : ”खूप झाली चर्चा, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही’ असा खणखणीत इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी काल शेतकरी प्रतिनिधींनी पाचव्यांदा सरकारसोबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार टाळाटाळ करीत केवळ वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शेतकरी चांगलेच संतापले. त्यामुळे चर्चेची पाचवी […]

थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायक दिलजीतने केली एक कोटींची मदत
मनोरंजन

थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायक दिलजीतने केली एक कोटींची मदत

नवी दिल्ली : ”‘प्लीज, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या इतकीच आमची विनंती आहे. येथे शेतकरी शांततेत आंदोलन कतोय. संपूर्ण देश शेतकऱ्यांसोबत आहे.’ असे म्हणत पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने केंद्रसरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. शनिवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधू बॉर्डरवर पोहचला. विशेष म्हणजे यावेळी थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत […]

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
राजकारण

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घायावेत आणि शेती मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच केंद्रसरकारने दिलेला चर्चेचा प्रस्तावही शेतकऱ्यांनी धुडकावून लावत हायवेवरच चर्चा करण्याची मागणी केली आहे. या परीस्थितीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून […]

शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा घालत एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा आणि देशव्यापी आंदोलनाचा इशारा
देश बातमी

शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा घालत एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा आणि देशव्यापी आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. शेतकरी आंदोलकांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आज दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे […]

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव
देश बातमी

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव

नवी दिल्ली : ”बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधीच जाणार नाही. असे म्हणत दिल्लीतील अनोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारचे आवाहन धुडकावून लावले आहे. कृषी विधेयक २०२० विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन केले होते. मात्र […]

शेतकरी आंदोलनातील अजीविषयी ट्वीट केल्याने कंगना नेटकऱ्याच्या निशाण्यावर
मनोरंजन

शेतकरी आंदोलनातील अजीविषयी ट्वीट केल्याने कंगना नेटकऱ्याच्या निशाण्यावर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून हे शेतकरी दिल्ली सीमेवर निषेध आंदोलन सुरु आहे. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमुळे कंगनावर टीकेची झोड उठली आहे. नेटकऱ्यानी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या […]

केंद्रसरकार नमले; ‘या’ दिवशी केंद्रीय कृषिमंत्री करणार शेतकऱ्यांशी चर्चा
देश बातमी

केंद्रसरकार नमले; ‘या’ दिवशी केंद्रीय कृषिमंत्री करणार शेतकऱ्यांशी चर्चा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठींबा दिला जात असताना गृहमंत्री अमित शहा यांनी ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या […]

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन
देश बातमी

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : ”सरकार तुमच्या मागण्यांवर तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. ३ डिसेंबर रोजी कृषी मंत्र्यांशी चर्चा करा. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. तसेच, ‘तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. ‘ असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू […]

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी ‘जय किसान’ होता आणि असेल” असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच, आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, […]