वाढत्या दबावानंतर अखेर संजय राठोडांचा राजीनामा
राजकारण

वाढत्या दबावानंतर अखेर संजय राठोडांचा राजीनामा

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. […]

संजय राठोड राजीनामा देण्यास तयार, पण…
राजकारण

संजय राठोड राजीनामा देण्यास तयार, पण…

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, शिवसेनेचे अन्य नेते आणि संजय राठोड यांच्यात बरच वेळ चर्चा झाली. संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. ते राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड […]

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
राजकारण

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी शिवसेनेत चढाओढ सुरु

मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अनेक गंभीर आरोप झालेल्या संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही दबाव वाढला आहे. तर असा तडकाफडकी राठोड यांनी राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी पक्षावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

संजय राठोड राजीनामा देणार? संजय राऊतांचे सूचक ट्वीट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवू देणार नाही, असा इशारा भाजपाने दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट […]

पूजा चव्हाण मृत्युप्रकरण; ‘शरद पवार, जागे व्हा’ घोषणाबाजी करत भाजपाचे आंदोलन
राजकारण

पूजा चव्हाण मृत्युप्रकरण; ‘शरद पवार, जागे व्हा’ घोषणाबाजी करत भाजपाचे आंदोलन

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने संजय राठोड यांच्यावर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेत आज पनवेलमध्ये आंदोलन केलं. पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना […]

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
राजकारण

संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही: भाजपचा आक्रमक पवित्रा

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असल्या कारणाने राज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्च ते १० मार्च या कालावधीत होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. अशात यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे घ्यावे हा प्रश्न राज्य सरकारपुढे होता. मात्र त्यातून मार्ग काढत यंदाचे […]

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ
राजकारण

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मात्र यासर्व आरोप प्रत्यारोपांनंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. या सर्व घटनाक्रमामुळे पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. मात्र आता तक्रारदार रेणू […]

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…

मुंबई : “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, ‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली […]

समाजमाध्यमांमध्ये माझ्याविरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे; बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
राजकारण

बलात्काराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंबाबत मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. हा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर […]

भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
राजकारण

भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर : आयारामांना पदे आणि सन्मान देण्याच्या धोरणातून कोल्हापूर भाजपामधला अंतर्गत वाद समोर आला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी […]