आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलाच करणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व; हातावर काढणार इनक्लाबी मेहंदी
महिला विशेष

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलाच करणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व; हातावर काढणार इनक्लाबी मेहंदी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन तीन महिन्यांपासून सुरु आहे. शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत तर केंद्र सरकारही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व महिला करणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. महिला दिनी महिला शेतकरी आंदोलक अद्वितीय प्रदर्शन करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा संपूर्ण दिवस नारी शक्तीसाठी समर्पित असेल. त्याचबरोबर महिला दिनी जास्तीत जास्त महिला शेतकरी आंदोलनात सहभागी व्हाव्यात यासाठी मोबाईलद्वारे संदेश पाठवले जात आहेत. दिल्लीच्या गाजीपूर सीमेवर निषेधार्थ बसलेल्या महिलांची बैठक झाली. यात त्यांनी ठरविले की महिला दिनाच्या दिवशी त्या हाताला मेहंदी लावून विरोध प्रदर्शन करतील. ही मेहंदी सामान्य मेहंदी नसून एक इनक्लाबी (क्रांतिकारी) मेहंदी असेल.

इनक्लाबी मेहंदी म्हणजे नक्की काय ?
शेतकरी आंदोलनात सहभागी महिला इंकलाबी मेहंदी म्हणजे काढणार आहेत. म्हणजेच त्या कृषी कायद्यांच्या विरोधात असलेल्या घोषणा हातावर काढणार आहेत. त्याचबरोबर, शेतातील इके, शेतकऱ्यांचे संघर्ष यासोबतच नांगर, फुरसा, ट्रॅक्टर इत्यादी शेती अवजारांची चित्रे रेखाटणार आहेत.

व्यासपीठही महिलाच सांभाळणार
महिला आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त होणाऱ्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची रूपरेषाही रवनीत कौर तयार करत आहेत. महिला दिनानिमित्त महिला शेतकर्‍यांना विशेष सन्मान देण्याबरोबरच हे संपूर्ण आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे रवनीत यांनी सांगितले. या दिवशी गाझीपूर आणि सिंधू-टिकारी सीमेवर महिला व्यासपीठही महिला आंदोलकच सांभाळणार आहे. भाषणही महिलाच करतील आणि आंदोलनात स्वयंसेवकाची भूमिकाही महिलाच बजावतील.

रवनीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांनी शेतकरी आंदोलनाची कमान आपल्या हाती घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही महिलांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व केले आहे. १८ जानेवारी रोजी महिला शेतकरी दिवस होता. यादिवशीही आंदोलनात महिलांना अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. तथापि, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी काहीतरी मोठे करण्याची तयारी केली जात आहे, जेणेकरून प्रत्येकजण आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. या अनोख्या आंदोलनात जास्तीत जास्त महिला शेतकर्‍यांना दिल्लीच्या सीमेवर आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी मोबाइलवरून मेसेजेसही पाठवले जात आहेत, जेणेकरुन महिला शेतकरी व्यासपीठावर पोहोचू शकतील.

संपूर्ण दिवसासाठी इतरही काही योजना
त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संपूर्ण दिवसासाठी काही अन्य योजना देखील बनविल्या गेल्या आहेत. यात अनेक महिला शेतकर्‍यांना व्यासपीठावर बोलावण्यात येईल व त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलनाशिवाय शेतात केलेल्या चांगल्या कामांसाठी त्यांना प्रोत्साहित व सन्मानित करण्यात येईल. काही महिला स्टेजवर येतील आणि त्यांचे अनुभव सांगतील, जेणेकरून त्या इतर महिला शेतकर्‍यांना प्रेरणा देईल.