#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
देश बातमी

#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील

नवी दिल्ली : ”आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. असं असतानाही ते दिल्लीला जाऊ लागले असता त्यांच्यावर वॉटर कॅनन आणि अश्रुधूर वापरण्यात आला. आमच्या ज्येष्ठांच्या आणि शेतकऱ्यांच्या पगड्या अशापद्धतीने उडवण्यात येणार असतील तर असे पुरस्कार आणि पदकं ठेऊन आम्ही काय […]

उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू
देश बातमी

उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू

लखनौ : रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर वाळूचा ट्रक पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबीमधील कडाधाम येथील देवीगंज चौकामध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातामध्ये आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून […]

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
राजकारण

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

मुंबई : “नारायण राणे हे कोणत्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत होते मला समजलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील’ असा स्पष्ट उल्लेख केल्याचं मला तरी आठवत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘मी स्वत: राज्याच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या चार-पाच महत्त्वाच्या जयंत […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज जवळपास ५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण […]

तिसऱ्या सामन्यात शमीने २ बळी घेतले तर मोडणार १८ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

तिसऱ्या सामन्यात शमीने २ बळी घेतले तर मोडणार १८ वर्षांपूर्वीचा विक्रम

कॅनबेरा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विकम मोडण्याची सुवर्ण संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शमीने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. तिसऱ्या वनडेमध्ये जर शमीने चांगली गोलंदाजी केली तर त्याच्याकडे १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. शमीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन विकेट्स मिळवल्या तर त्याला १८ वर्षांपूर्वीचा सर्वात जलद […]

साधारणपणे एक मास्क कधीपर्यंत वापरावा?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

साधारणपणे एक मास्क कधीपर्यंत वापरावा?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकाधिक लोकांना संक्रमित करत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी फार आधीपासूनच आरोग्य खातं आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मास्कच्या वापरावर सातत्याने भर देण्यात येत आहे. पण, एक मास्क कधीपर्यंत वापरायला हवा हे तुम्हाला माहित आहे का? सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनापासून बचावासाठी सर्जिकल आणि कापडापासून तयार करण्यात आलेला […]

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी
क्रीडा

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी

कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याची कोविड-१९चे नियम मोडल्याप्रकरणी स्थानिक टी-२० स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या Quaid-e-Azam ट्रॉफीत रझा हसन सहभागी झाला होता. संघाच्या मेडीकल टीमची परवानगी घेतल्याशिवाय रझा हसन बायो सेक्युर बबल मोडून हॉटेलबाहेर गेला. रझा हसनचं […]

‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान
कोरोना इम्पॅक्ट

‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान

न्यूयॉर्क : गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. महामारीचा प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून जगभरात एक शब्द सारखाच कानावर पडत आहे, तो म्हणजे पॅन्डेमिक. मार्च महिन्यानंतर कोरोना महामारीशी संबधित पॅन्डेमिक या शब्दाच्या वापरात इंटरनेटवर करण्यात आलेल्या सर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर जगातील दोन प्रमुख डिक्शनरींनी ‘पॅन्डेमिक’ या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून […]

मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये; शिर्डीतील साई मंदिर संस्थांचे आवाहन

अहमदनगर : लॉकडाऊननंतर राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे हे मंदिर खुले झाल्यापासून साईभक्तांची येथे मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मात्र आता साईबाबा मंदिर प्रशासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे. मंदिरात येताना […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न आहे की कोरोनावरील लस कधी येणार? पण, कोरोनावरील लस आली तरी ती लगेच प्रत्येकाला मिळणार नाही त्याचा प्रधान्यक्रम ठरवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे. कोरोना […]