PM Narendra Modi: ‘ईडीने तुम्हाला एकत्र आणलं,’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विरोधकांवर टीकेचा हल्लाबोल
राजकारण

PM Narendra Modi: ‘ईडीने तुम्हाला एकत्र आणलं,’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विरोधकांवर टीकेचा हल्लाबोल

PM Narendra Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. काल राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला आहे. ‘ईडीमुळे विरोधक एकत्र आले, निवडणूक हरल्यानंतर एकत्र आले नाहीत. मतदारांना जे जमलं नाही ते ईडीमुळे शक्य झालं’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केली आहे. […]

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं. राहुल गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेतील अनुभवांची मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे मुद्दे, पीक विमा योजना आणि अदानी उद्योग समूह आणि हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन हल्लाबोल केला. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न […]

अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली – राहुल गांधी
राजकारण

अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलत असताना केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. सुरुवातीला त्यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली. या यात्रेत अनेक युवकांनी अग्निवीर योजनेची तक्रार केली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच ही योजना सैन्याला देखील रुचलेली नाही, असा दावा त्यांनी केला. सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की, […]

…तरीही केसीआर खुल्या मैदानात यायला तयार नाहीत; सामनातून नांदेडच्या सभेवर भाष्य
राजकारण

…तरीही केसीआर खुल्या मैदानात यायला तयार नाहीत; सामनातून नांदेडच्या सभेवर भाष्य

ठाकरे गटाने आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (K C RAO) यांच्या नांदेडमध्ये पार पडलेल्या सभेवर भाष्य केले आहे.तसेच यावेळी ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधत जोरदार टोलेबाजीही केली आहे. लेखात म्हंटले आहे की,“चंद्रशेखर राव रविवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांच्या पक्षविस्तारासाठी येऊन गेले. ”अब की बार किसान सरकार” असा नारा त्यांनी दिला. शेतकरी, […]

कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज? भाजपला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात उतरणार
राजकारण

कसब्यातील ब्राह्मण मतदार नाराज? भाजपला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात उतरणार

पुणे: कसबा पोटनिवडणुकीचे वातावरण आता चांगलेच पेटले आहे. कसब्यात लावण्यात आलेल्या एका बॅनरची राज्यभर चर्चा होत असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसते.’कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे. […]

..तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडून भाजपची तर उद्धव ठाकरेंकडून सेनेची ऑफर; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट
राजकारण

..तेव्हा गोपीनाथ मुंडेंकडून भाजपची तर उद्धव ठाकरेंकडून सेनेची ऑफर; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

ठाणे : ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून जोरदार फोडाफोडी सुरू आहे. तब्बल 22 नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मी साधारण 1987 साली माझे भाग्यविधाते आदरणीय पवार साहेब यांच्या संपर्कात आलो अन् माझ्या राजकीय कारकिर्दीला खर्‍या अर्थाने […]

पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय?
राजकारण

पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांना त्यांनी उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश […]

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं; वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही
राजकारण

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं; वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं आहे. “आजच्या क्षणाला वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीचा भाग नाही, आम्ही शिवसेनेशी युती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निरोप येईल, तेव्हा आम्ही ठरवू” , असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. चित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाची नुकतीच युती झाली आहे. मात्र, ते महाविकास […]

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली
राजकारण

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली

मुंबई : संजय राऊत दररोज कोणत्याही विषयावर बोलत असतात. ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नसतो त्याच्यावरही बोलत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत म्हणून जागा दाखवून दिली आहे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांनी लायकीच काढली आहे अशी जहरी टीकाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ […]

अण्णा हजारे भारावले, देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ध्येयवादी माणसेच…
राजकारण

अण्णा हजारे भारावले, देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ध्येयवादी माणसेच…

अहमदनगर : तब्बल बारा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर राज्यात लोकायुक्त कायद्याचे विधेयक विधिमंडळात येत असल्याने यासाठी पाठपुरावा करीत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. ते म्हणाले, ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात, मात्र काही ध्येयवादी लोक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात.’ हे विधेयक आणत […]