महाराष्ट्रात नव्या दलित चेहऱ्याचा उदय; आझाद समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
राजकारण

महाराष्ट्रात नव्या दलित चेहऱ्याचा उदय; आझाद समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई : युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन दलित चेहरा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला एक सक्षम आणि कणखर आंबेडकरी युवा नेतृत्व दिलं असल्याच्या भावनाही युवकांमधून उमटू लागल्या आहेत. आज़ाद समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर […]

9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 18 हजार कोटी
राजकारण

जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण

नवी दिल्ली : “जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! म्हणजे सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरी. या लसिना मंजुरी मिळाल्यामुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळनार आहे. या मोहीमेसाठी जीव तोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतात […]

कोल्हापूर महापालिका निवडणूक; प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी अन् सूत्रधार
राजकारण

कोल्हापूर महापालिका निवडणूक; प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी अन् सूत्रधार

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने कारभारी अन् सूत्रधार नेमले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी भागाभागात नवर्षाच्या शुभेच्छा देत आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. गतवेळीप्रमाणेच यावेळी आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याची चिन्हे आहेत. […]

टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…
राजकारण

टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…

नवी दिल्ली : मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केले होते. या वक्तव्यानंतर यादव यांच्यावर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी आज आपला सूर बदलला आहे. ”गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असे ट्वीट करत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. […]

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील
राजकारण

सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना’तील अग्रलेखातील भाषेवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अग्रलेखातील भाषेबद्दल रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या पत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या […]

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले
राजकारण

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले

जालना : ”औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतरणाचा मुद्दा चांगलाच उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. ”काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल भाजपा नेते राम […]

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार
राजकारण

शिवसेना आक्रमक; 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

मुंबई : शिवसेना नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि आपापल्या वाहनांमधून शिवसैनिक दाखल होणार आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, आणि त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर काही दिवसातच शिवसेना […]

पुण्यात पुन्हा अजित पवार फडणवीस एकत्र; मग घडलं असं काही…
राजकारण

पुण्यात पुन्हा अजित पवार फडणवीस एकत्र; मग घडलं असं काही…

पुणे : पुण्यातील भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने […]

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा
राजकारण

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी, कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच, यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी […]