वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर
राजकारण

वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत एक दिवस आधीच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता होती. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांना […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
राजकारण

नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? मुख्यमंत्री ठाकरेंचा नागपूरकरांना मिश्कील सवाल

मुंबई : सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी बोलताना मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
राजकारण

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना कॉंग्रेस […]

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
राजकारण

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केल्यानंतर आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. […]

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून ‘अग्रलेखा’तूनच खरमरीत प्रत्युत्तर
राजकारण

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून ‘अग्रलेखा’तूनच खरमरीत प्रत्युत्तर

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दैनिक सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनातील भाषेविषयी पत्र लिहिले. यात दैनिक सामनाच्या अग्रलेखात राज्यातील आणि केंद्रातील भाजपा नेत्यांविषयी खालच्या स्तराची भाषा वापरली जाते, अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या पत्राला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातूनच उत्तर दिले आहे. ”चंद्रकांतदादांचे पत्रलेखन […]

हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे; सचिन पायलटांचा आरएसएसवर हल्लाबोल
राजकारण

हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे; सचिन पायलटांचा आरएसएसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे, तर शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे.” अशा शब्दात राजस्थान कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर टीका केली. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.जयपूर येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेत ते बोलत […]

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

नाशिक : ”औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे.” अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादच्या नामांतरणावर भाष्य केले आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत अजित पवार […]

वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच:  शिवसेना
राजकारण

बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ: संजय राऊत

मुंबई : ‘या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरु. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो,’ असे ट्विट करत प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रस्त्यावर उतण्या […]

उद्यापासून सुरु कोरोना लसीकरणाची तालीम; महाराष्ट्रातील ‘या’ ४ जिल्ह्यांची निवड
राजकारण

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल

नवी दिल्ली : “कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सीनसह मोहीम सुरू करू शकतो.” असं म्हणत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी मंजुरी दिलेल्या लसीबाबत […]

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराला पाठिंबा दिला आहे. तर, काँग्रेसनं कडाडून विरोध दर्शवला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असं आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं […]