अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार
इतर राजकारण

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी मागण्यात आल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी […]

परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलंही नव्हतं; पवारांचा पाटलांना टोला
राजकारण

परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलंही नव्हतं; पवारांचा पाटलांना टोला

पुणे : “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. तसेच, चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा अजित पवारांनी लगावला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात […]

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार
राजकारण

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार

पुणे : ‘देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार. असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. कोल्हापूरला परत जाण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अनेक चर्चांना वाव दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष पदी असणाऱ्या पाटील यांच्या या […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?; भाजपा

मुंबई : “दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”, अशा शब्दात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली […]

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार
राजकारण

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार

मुंबई : विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल. अशा शब्दात शिवसेनेने सामना संपादकीयमधून युपीएवर निशाणा साधला आहे. तसेच, प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा […]

त्यांना जिवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन; मुख्यमंत्र्यांचा माफियांना इशारा
राजकारण

त्यांना जिवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन; मुख्यमंत्र्यांचा माफियांना इशारा

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या चौथ्या कार्यकाळात चौहान यांची कार्यपद्धती बरीच बदलली आहे. राज्यातील माफियांविरोधात कडक पावलं उचलण्यास त्यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात ते वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत. असाच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांनी थेट गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. भोपाळमधील होशांगबाद येथील भाजपाच्या […]

फडणवीसांचा विक्रम मोडीत; ही तरुणी 21व्या वर्षीच झाली महापौर
राजकारण

फडणवीसांचा विक्रम मोडीत; ही तरुणी 21व्या वर्षीच झाली महापौर

थिरुवनंतपुरम : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. परंतु त्यांचा हा विक्रम मोडीत निघाला आहे. नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्या वेळी फडणवीस यांचं वय 27 वर्षं होतं. फडणवीस नागपूर महापालिकेचे नगरसेवक 21व्या वर्षीच झाले होते आणि तेही एक रेकॉर्डच […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला

पाटणा : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाला मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जदयूचे 6 आमदार फोडले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. जदयुचे एकूण सात आमदार होते, आता त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे. सातपैकी सहा आमदार फुटले असल्याने पक्षांतरबंदी […]

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात; वाचा, नक्की काय झाले
राजकारण

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात; वाचा, नक्की काय झाले

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने […]

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू
राजकारण

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू

मुंबई : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमीत्त राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे मात्र नक्की ! बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी ! बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी ! पण, आज दिवस आहे जल्लोषाचा […]