ज्या गोदी मीडिया ने तबलिगींना कोरोना पसरविण्यासाठी धरले जबाबदार; तेच आता शेतकऱ्यांना….
राजकारण

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपा’चे अनोखी रणनिती; गावागावात, चौकाचौकात शेतकऱ्यांची चर्चा करा

नवी दिल्ली : मोदी सरकारला नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून चारही बाजूने घेरण्यात आले आहे. पंजाबनंतर हरियाणा, दिल्ली, यूपीसह देशभरातील शेतकरी विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, उत्तरप्रदेशात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी तेथील पोलीस अत्यंत कठोर वागणूक देत आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना […]

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार
राजकारण

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार

पश्चिम बंगाल : ”आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही,” असा निर्धार नुकातच भाजपात गेलेले सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. अंतर्गत मतभेदातून गेल्या आठवड्यात सुवेंदु अधिकारी यांच्यासह काही नेत्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला हजेरी लावली. या प्रचारसभेत त्यांनी हा निर्धार केला. ममता बॅनर्जी यांच्या […]

लक्षात ठेवा…खुनाचे प्रयत्न आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही
राजकारण

लक्षात ठेवा…खुनाचे प्रयत्न आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही

मुंबई : हरियाणातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना खुनी ठरवले. खुनाच्या प्रयत्नाचे आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा हा संघर्ष मिटवता येणार नाही. हे हरयाणा आणि केंद्रातील सत्ताधिशांनी लक्षात ठेवावे. अशा शब्दात शिवसेनेने आज सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि खट्टरसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर अंबालामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. कृषी कायद्यांविरोधात […]

खासदार संभाजीराजे आक्रमक; ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही,पण…
राजकारण

खासदार संभाजीराजे आक्रमक; ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही,पण…

पुणे : ”ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. तसेच, ‘सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे, असेही संभाराजेंनी म्हटलंय. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) […]

त्रास होत असेल तर म्हणत शिवसेना आमदाराला निलेश राणेंची भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर
राजकारण

त्रास होत असेल तर म्हणत शिवसेना आमदाराला निलेश राणेंची भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर

मुंबई : भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार राजन साळवींना भाजपकडून आमदारपदाची खुली ऑफर देत त्रास होत असेल तर भाजपमध्ये या असे म्हटले आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये […]

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…
राजकारण

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…

मुंबई : अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती. मात्र, या प्रकरणी अ‍ॅमेझॉन कोर्टात गेले आहे.दिंडोशी न्यायालयाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आणि मनसे सचिवांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर […]

नरेंद्र मोदी केवळ मोजक्या भांडवलदारांसाठी काम करतात
राजकारण

नरेंद्र मोदी केवळ मोजक्या भांडवलदारांसाठी काम करतात

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित होते. दरम्यान याआधी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत कारवाई केली. फक्त तीनच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. […]

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल
राजकारण

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : ”जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहुल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कृषी […]

काँग्रेसची गळती सुरुच; १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

काँग्रेसची गळती सुरुच; १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडी : काँग्रेसची गळती सुरुच असून सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे भिवंडीतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून 2 नगरसेवक बाहेरगावी असल्याने त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही लवकरच त्या दोघांचाही पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत […]

भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
राजकारण

भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार […]