सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण
राजकारण

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्यावर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पवार यांनी सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बोलताना […]

विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी
राजकारण

विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी

धुळे : विधान परिषदेचा पहिला निकाल आताच हाती आला असून भारतीय जनता पक्षाच्या अमरीश भाई पटेल यांनी बाजी मारली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु झाली आहे. धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपचे […]

बीएचआर घोटाळ्यात भाजपचा मोठा नेता गळाला? पोलिसांना दिले ढिगभर पुरावे’
राजकारण

बीएचआर घोटाळ्यात भाजपचा मोठा नेता गळाला? पोलिसांना दिले ढिगभर पुरावे’

जळगाव : राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात भाजपचा मोठा नेता गळाला लागण्याची शक्यता आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन […]

आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका
राजकारण

आरएसएसशी संल्गन असणाऱ्या मंचाचा केंद्र सरकारला विरोध; मांडली ही भूमिका

नवी दिल्ली : मोदी सरकारने मांडलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात अनेक राज्यांत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंजाब- हरियाणा या दिल्ली लगतच्या राज्यांमध्ये याविरोधात तीव्र जनभावना आहेत. आता खुद्द संघाच्या मुशीत वाढलेल्या स्वदेशी जागरण मंचानेदेखील या विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. कृषी विधेयकांमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीला धक्का बसणार नाही, याचं ठोस […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
राजकारण

बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; ‘या’ केंद्रिय मंत्र्यांचा योगींना घरचा आहेर

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर दिला आहे. इलेटक्ट्रिक रिक्षा आणि गुड्स करिअरच्या उद्धाटनासाठी ते मुंबईत आले होते. योगी आदित्याथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते मुंबईतील प्रतिष्ठित […]

तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा : शिवसेना
राजकारण

योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं

  मुंबई : “ती नटी म्हणतेय की मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  मुंबईत आले आहेत. त्यांनी स्पष्ट करावं की ते नेमकं मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीमध्ये,” असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रनौत तसेच योगी आदित्यनाथ यांना लगावला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच […]

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
राजकारण

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने […]

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर
राजकारण

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर

मुंबई : ”उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं.” असे सांगत मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आज अखेर उत्तरप्रदेशातील फिल्मसिटीची अधिकृत घोषणा केली. मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि […]

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा
राजकारण

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा

मुंबई : “मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? कि त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय ?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. तसेच, योगी आदित्यनाथ […]

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
राजकारण

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

मुंबई : “नारायण राणे हे कोणत्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत होते मला समजलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील’ असा स्पष्ट उल्लेख केल्याचं मला तरी आठवत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘मी स्वत: राज्याच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या चार-पाच महत्त्वाच्या जयंत […]