अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका
मनोरंजन

अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घरांवर ३ मार्च रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. या कारवाईत अनुराग आणि तापसी यांच्या घरून त्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. ‘आयकर’च्या पथकांनी अनुराग, तापसी यांच्यासह फँटम फिल्म या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर आयकर विभागाच्या माहितीनुसार, प्रोडक्शन हाऊसच्या शेअर्सच्या खरेदी- विक्री दरम्यान पैशांची हेराफेरी झाल्याचे काही पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत. त्यात एकूण ३५० कोटी रुपयांची गडबड झाल्याचं समोर आलं आहे. तापसीच्या नावावर ५ कोटी रुपयांची कॅश रिसीटदेखील मिळाली आहे. याबद्दल माहिती देणारी एक प्रेस नोट सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. आयकर विभागाने एकूण ३० ठिकाणांवर छापे टाकले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत अनुराग आणि तापसीच्या घरी शोधमोहीम सुरू होती. त्यानंतर त्या दोघांचेही फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले.

दरम्यान या सर्व घटनाक्रमानंतर तापसीच्या चाहत्यांनी तिच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत. अगदी काही तासांत तापसी सोशल मीडियावर ट्रेण्ड करू लागली. नेटकऱ्यांनी तापसीला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. तापसीने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे सरकारने तिच्याविरुद्ध पाऊल उचलल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणे आहे. त्याचबरोबर ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप करत विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेनंही या कारवाईवरून मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

“देशातील राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे होत आहे? केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. असे शिवसेनेने म्हंटल आहे.