भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी
राजकारण

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी

कोलकाता : भाजप खासदाराच्या पत्नीनं तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून या प्रसंगानंतर संतापलेल्या भाजप खासदारानं पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या लाटेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली. त्यानंतर आज भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल खान यांनी भाजपतून बाहेर पडत ममतांचा हात धरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे खान यांनी मी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. माझी तिला विनंती आहे की, माझं आडनाव लावू नकोस. तुझ्या नावासमोरील खान आडनाव काढून टाक. ते तुझे अधिकार कापून टाकतील. त्यांनी तुझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना तुझा जॉब ममता बॅनर्जींनी हिरावून घेतला होता. मी माझं वचन पाळलं. मी तुला उभं केलं. निम्मा पगार तुझ्या खात्यावर जमा केला. कारण, तुला पैसे मागायला लागू नये म्हणून आणि आता ज्यांनी तुला भूतकाळात दुःख दिलं, त्यांच्याशी तू हातमिळवला आहेस, असं बोलताना खान यांचे डोळे भरून आले.

भाजपानं मला ओळख मिळवून दिली. भाजपशिवाय मी कुणीच नाही. हे खरं आहे की तू माझा प्रचार केला, पण मी भाजपाच्या नावाशिवाय जिंकू शकलो नाही. प्रत्येक घरात भांडणं होतात. पण महत्त्वकांक्षा जपण्यासाठी तू कुटुंबापेक्षा राजकारण निवडले आङे. तू अडकली आहेस, तुझी खूप मोठी चूक झाली आहे, असं सांगत खान यांनी घटस्फोट देणार असल्याची माहिती दिली.