ट्विट करत कंगनाने पुन्हा साधला दिलजीतवर निशाणा, आता प्रियंकालाही लगावला टोला
मनोरंजन

ट्विट करत कंगनाने पुन्हा साधला दिलजीतवर निशाणा, आता प्रियंकालाही लगावला टोला

नवी दिल्ली : ”प्रिय दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा जर खरंच शेतकऱ्यांची चिंता असेल, जर खरंच आपल्या मातांचा सन्मान-आदर करत असाल तर ऐका कृषी विधेयक काय आहे! की फक्त आपल्या मातांचा, बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे? वाह रे दुनिया वाह…” असे ट्विट् करत अभिनेत्री कंगना रानौतने पुन्हा दिलजीत दोसांज वर निशाणा […]

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा अजबगजब दावा
राजकारण

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा अजबगजब दावा

जालना : “शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. तसेच, या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणाही यावेली […]

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान
देश बातमी

मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान

शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंद ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा भारत बंद संपतासंपता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली […]

#भारतबंद : “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” पुण्यात शिखांची नारेबाजी
पुणे बातमी

#भारतबंद : “ना धर्म दा, ना सायन्स दा, मोदी है रिलायन्स दा,” पुण्यात शिखांची नारेबाजी

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक […]

इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?; कमलनाथांनी भाजपाला सुनावले
राजकारण

इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?; कमलनाथांनी भाजपाला सुनावले

“इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी येथे उपस्थित असलेले शेतकरी वेडे आहेत का? आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की ३० वर्षांपूर्वीचे शेतकरी आणि सध्याचे शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. हल्लीचा शेतकरी हा सुशिक्षित आहे. त्याला आसापस घडणाऱ्या गोष्टींची अगदी नीट माहिती असते.” अशा शब्दात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आंनी कॉंग्रेसनेते कमलनाथ यांनी भाजपाचा सुनावले आहे. […]

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये […]

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारचा मोठा निर्णय
देश बातमी

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दहा-बारा दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता केरळ सरकारही उतरल्याचं दिसून आलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळचे कृषी मंत्री व्ही. एस. सुनिल कुमार म्हणाले की, […]

#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना […]

संभाजी ब्रिगेडचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; ७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
देश बातमी

शेतकऱ्यांसाठी भारत बंद’ला देशभरातून समर्थन; तर अनुचित प्रकार न घडण्यासाठी केंद्राकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद’चे आवाहन केले आहे. भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर […]

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य
बातमी महाराष्ट्र

७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

”उद्याचा भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजप सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही, #किसानों_के_संग_भारत_बंद” असे ट्वीट करत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यतील जनतेला भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. तसेच, “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या […]