ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द
कोरोना इम्पॅक्ट

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणं थांबवण्याचा निर्णय […]

राहुल गांधीनंतर काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष राहिलेल्या वोरांचे निधन
देश बातमी

राहुल गांधीनंतर काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष राहिलेल्या वोरांचे निधन

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे आज(ता. २१) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. मोतीलाल वोरा यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, त्यांना उत्तर प्रदेशचे […]

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले […]

माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनाया पुन्हा घेणार एक्झिट
मनोरंजन

माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनाया पुन्हा घेणार एक्झिट

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका गेली तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतल्या व्यक्तिरेखाही नेहमीच चर्चेत राहतात. त्यात शनाया तर सर्व प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका सुनीलच्या सहज अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. आता तिच्याबद्दलचीच एक बातमी समोर आली आहे. या मालिकेच्या कथानकाला आता ट्विस्ट मिळणार असून शनाया […]

मिथून चक्रवर्तीच्या तब्येतीत अचानक बिघाड; थांबवली शूटींग
मनोरंजन

मिथून चक्रवर्तीच्या तब्येतीत अचानक बिघाड; थांबवली शूटींग

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची तब्येत अचानक बिघडली. ‘कश्मीर फाइल्स’ या त्यांच्या चित्रपटाचे शुटींग मसूरी येथे चालू होते ते अचनाक थांबविण्यात आले आहे. फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात आले असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उभे देखील राहता येत नव्हते. आपला शॉट पूर्ण होण्यासाठी त्यांना खूप […]

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राजकारण

फडणवीसांचे राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर; भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट…

नाशिक : ”सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत आहेत. भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होतील. असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपातील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून लवकरच राष्टवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. याला फडणवीस यांनी उत्तर दिले […]

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन…
राजकारण

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन…

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यात असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुका चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. एका बाजूला भाजपनं […]

त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय; राममंदिर वर्गणीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
राजकारण

त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय; राममंदिर वर्गणीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

मुंबई : “राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय”, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राम मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू […]

वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच:  शिवसेना
राजकारण

वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच: शिवसेना

मुंबई : रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा. मंदिरनिर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे. असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. तसेच, आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख […]

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ
देश बातमी

दिल्लीत शेतकऱ्यांचे आज पुन्हा एक दिवसीय उपोषण; तर केंद्राकडून पुन्हा चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आज पुन्हा चर्चेच चर्चेचं निमंत्रण पाठवलं असून बाततीचसाठी आपल्या सोयीनुसार तारीख निश्चित करण्यास सांगितलं आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत नाहीत तोपर्यत […]