प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा संसर्ग आता अतिशय वेगानं फैलावू लागला आहे. फेरीवाल्यापासून ते मोठमोठ्या राजकीय नेत्यानाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात आहे. अशातच बॉलीवूड कलाकारांनंतर आता मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी असलेले अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती, अभिनेता उमेश कामत याही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ‘दुर्दैवानं […]

राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर केला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. या दाव्याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं उत्तर राजेश टोपे यांनी दिले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची […]

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून […]

आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती…
कोरोना इम्पॅक्ट

नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक; कोरोनासंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वार ही बैठक होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, इतर राज्यातील […]

गरजूंना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा; आनंद महिंद्राची राज्यआणि केंद्रसरकारला विनंती
कोरोना इम्पॅक्ट

गरजूंना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा; आनंद महिंद्राची राज्यआणि केंद्रसरकारला विनंती

मुंबई : देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. अशातच महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थितीत गंभीर होत चालली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावावर काळजी व्यक्त करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे विशेष विनंती केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम […]

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

नागपूर, नाशिकनंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिक नंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ असल्याने औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. त्याचबरोबर, औरंगाबाद शहरातील हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनानं […]

राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…
कोरोना इम्पॅक्ट

राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…

मुंबई : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला; दिवसभरात ५० जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर सुरूच आहे. आज(ता. १४) दिवसभरात राज्यभरात १६ हजार ६२० कोरोनाबाधित वाढले असुन, ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२८ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात रुग्णांची संख्या १५ हजार पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. आज(ता. १३) दिवसभरात राज्यात ८८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित वाढले […]

विमानप्रवासाला निघालात; थांबा आधी ही बातमी वाचा
कोरोना इम्पॅक्ट

विमानप्रवासाला निघालात; थांबा आधी ही बातमी वाचा

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण संचालनालयाला (DGCA) विमान प्रवासासंबधी काही आदेश दिले आहेत. न्यायालयानं दिलेल्या आदेशांनुसार DGCAनं हनुवटीवर किंवा कोणत्याही चुकीच्या प्रकारे मास्क घातलेले प्रवासी दिसल्यास त्यांना तात्काळ विमानातून बाहेरची वाट दाखवावी, असे आदेश दिले आहेत. यानंतर नागरी उड्डाण संचालनालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरच्या माध्यमातून काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात […]