#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार

नवी दिल्ली : ”नव्या कृषी कायद्यानुसार, तीन दिवसात शेतकऱ्यांना तीन दिवसात त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याची तरतूद केली आहे. तीन दिवसात पैसे न मिळाल्यास ते ताक्रात करू शकतात. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांची अनेक बंधने दूर झाली आहेत. तसेच त्यांना या कायद्याद्वारे नव्या संधीदेखील मिळणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात बोलताना दिली. […]

#मनकीबात :  अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार
देश बातमी

#मनकीबात : अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला मन की बात कार्यक्रमातून संबोधित करत आहेत. देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर ते काही महत्त्वाची घोषणा करू शकतात. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पंतप्रधानांच्या भाषणाला सुरवात झाली असून त्यांनी सुरवातीलाच देशातील १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीबाबत महत्त्वाची माहिती दिली […]

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर
देश बातमी

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे बदल येत्या 1 डिसेंबरपासून होत आहेत. घरगुती वापराच्या एलपीजी सुविधेपासून विमा सेवा आणि रेल्वे गाड्यांच्या बदलत्या वेळा इथपर्यंत हे नवे बदल होणार आहेत. या महत्त्वाच्या बदलांविषयी आपल्याला माहित असणे खूप गरजेचे आहे. देशात नक्की काय बदल होणार आहेत? १: एलपीजी किंमतीत बदल घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर

नवी दिल्ली : अनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, टाईप ओ आणि आरएच-निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक कमी आहे. या शोधात 2 लाख 25 हजार 556 कॅनडाई लोकांना सामिल करण्यात आलं होतं. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी ए, एबी, बी […]

केंद्रसरकार नमले; ‘या’ दिवशी केंद्रीय कृषिमंत्री करणार शेतकऱ्यांशी चर्चा
देश बातमी

केंद्रसरकार नमले; ‘या’ दिवशी केंद्रीय कृषिमंत्री करणार शेतकऱ्यांशी चर्चा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठींबा दिला जात असताना गृहमंत्री अमित शहा यांनी ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या […]

चीनचा कांगावा; म्हणे, कोरोना विषाणूचा उगम भारतातून
विदेश

चीनचा कांगावा; म्हणे, कोरोना विषाणूचा उगम भारतातून

नवी दिल्ली-  संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसचा शाप देऊन त्रस्त करणाऱ्या चीनने आता नवीन कांगावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी अमेरिका आणि इटलीवर कोरोना विषाणूच्या जन्माचे खापर फोडणाऱ्या चीनने कोरोना विषाणूचे उगमस्थान भारतात असल्याचा अजब दावा केला आहे. भारतात २०१९ मध्ये उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेदरम्यान प्राण्यांपासून […]

तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव हेच राहिल; ओवेसींचे योगींना प्रत्युत्तर
देश

तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव हेच राहिल; ओवेसींचे योगींना प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या, आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” या वक्तव्याला एमआयएम प्रमुख असदुद्दीनओवेसी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. येथील महापालिका निवडणुकीमुळे हैदराबादमधील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ आणि […]

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
देश बातमी

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

नवी दिल्ली: हनी ट्रॅप रचण्यात आघाडीवर असलेल्या पाकिस्तानच्या जाळ्यात आणखी एक जवान सापडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलने शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा प्रकाश काळे हा ऑगस्ट २०१९ मध्ये येथे तैनात […]

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन
देश बातमी

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : ”सरकार तुमच्या मागण्यांवर तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. ३ डिसेंबर रोजी कृषी मंत्र्यांशी चर्चा करा. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. तसेच, ‘तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. ‘ असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
देश

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर, भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना

उत्तर प्रदेशातील शहरांची नावं बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या प्रचारासाठी तेलंगणात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी हैदराबादचं नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. […]