देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर
पुणे बातमी

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही

पुणे : राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्य्राथ्यानी हे आंदोलन घेतले. तर आज सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘एमपीएससी’च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले मी […]

युवराज दाखलेवर तडीपारीची कारवाई; आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती
पुणे बातमी

युवराज दाखलेवर तडीपारीची कारवाई; आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवराज दाखलेला अटक केल्यानंतर आता त्याचवर थेट तडीपारीची कारवाई होणार आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या युवराज दाखले यानं हा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला होता. याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्या कोमल शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर […]

तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस
पुणे बातमी

तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी रविवारी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यानंतरही हा वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे वानवडी पोलिसांनी पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बजावलेली नोटीस.तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत […]

अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार
पुणे बातमी

अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

पुणे : अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ मार्चला अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी शहरासह आसपासच्या उपनगरातून अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद […]

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की अफवा? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की अफवा? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचे वाढती संख्या लक्षात घेता प्रसासनाने पुणे शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरवल्या जात आहेत. अशातच पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत […]

केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….
पुणे बातमी

केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….

पुणे : केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरळमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट शहरात येण्यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी दिले आहेत. याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनासही याबाबत राज्य शासनाच्या सुचनेनुसार याबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रेल्वे, विमान व बससह केरळमधून खासगी वाहनांनी येणाऱ्या सर्वांची तपासणी करणे […]

पुण्यात फलंदाजाचा मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पाहा व्हिडिओ
पुणे बातमी

पुण्यात फलंदाजाचा मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पाहा व्हिडिओ

जुन्नर : क्रिकेटच्या भर मैदानात बॅटिंग सुरू असतानाच नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली आहे. जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरू आहेत. आज दुपारी ओझर संघ व जांबुत […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव आल्याने खळबळ
पुणे बातमी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २ जण ताब्यात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन […]

यंदाचा वशाटोत्सोव होणार ग्रँडवशाटोत्सव; दिग्गजांची राहणार उपस्थिती
पुणे बातमी

यंदाचा वशाटोत्सोव होणार ग्रँडवशाटोत्सव; दिग्गजांची राहणार उपस्थिती

पुणे : सालाबादाप्रमाणे यावर्षीही हे थोर आहे फेसबुकीय मित्रमंडळाकडून वशाटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वशाटोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून यावर्षी अनेके दिग्गज व्यक्ती यंदाच्या वशाटोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार असणार आहेत. त्याचबरोर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राजकीय व्यक्तीसोबत साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती राहणार […]

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
पुणे बातमी

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुणे : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज (ता. १५) पुण्यात राहत्या घरी निधन झाले. एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. आज, निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी (ता. 16) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यांचे वय ९१ वर्षे होते. पी. बी. सावंत बॉम्बे […]